Vande Bharat Express : महाराष्ट्राला मिळणार आणखी 7 वंदे भारत एक्सप्रेस; पहा कोणकोणत्या मार्गावर धावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express : संपूर्ण भारतात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची चर्चा आहे. लांबच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असल्याने अनेक प्रवाशी वंदे भारताला आपलं प्राधान्य देत आहेत. प्रवाशांची वाढती मागणी पाहता भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात नवनवीन वंदे भारत ट्रेन चालवत आहे. देशात एकूण ४१ मार्गावर रेल्वे सुरु आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यंत तब्बल ७ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत, त्यामुळे वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळाली आहे. त्यातच आता आणखी एक खुशखबर आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्राला आणखी ७ वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.

कोणकोणत्या मार्गावर सुरु होणार 7 वंदे भारत – Vande Bharat Express 

महाराष्ट्राला ज्या नव्या ७ वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत त्यामध्ये मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते सिंकदराबाद, मुंबई ते शेगाव, पुणे ते बडोदा, मुंबई ते अहमदाबाद आणि मुंबई ते शेगाव या मार्गावर धावणार आहेत. या नव्या ७ वंदे भारत एक्सप्रेसमुळे (Vande Bharat Express) राज्यातील वाहतुकीला आणखी चालना मिळेल आणि प्रवाशांचा प्रवासही अगदी सुखकर आणि आरामदायी होईल. मुंबई- शेगाव वंदे भारत मुळे गजाजन महाराजांच्या भक्तांना चांगली सुविधा मिळेल, तर मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत मुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना वंदे भारतचा अनुभव घेता येईल.

सध्या कोणकोणत्या मार्गावर वंदे भारत धावत आहे

महाराष्ट्रात सध्या ७ वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express )रुळावरून धावत आहेत. राज्यात सप्टेंबर २०२२ मध्ये मुंबई ते गांधीनगर ही पहिली वंदे भारत ट्रेन सुरु झाली. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये नागपूर बिलासपूर वंदे भारत ट्रेन सुरु झाली. नंतर पुणेमार्गे मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली. साईबाबा दर्शनासाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली. त्यानंतर मुंबई ते मडगाव आणि नागपूर- इंदूर वंदे भारत एक्सप्रेस जून महिन्यात सुरु झाली. नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेनला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.