Vande Bharat Express : कोल्हापूर-मुंबई मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ? पहा अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express : कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर रेल्वेसाठी मोठी गर्दी असते. या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून वाढत आहे. त्यातच आता ही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यामुळे लवकरच मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू होण्याची चिन्ह आहेत.

कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express)

रेल्वेच्या बाबतीतलं आपलं निवेदन खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिले आहे. या निवेदनात म्हंटले आहे की कोल्हापूर- मुंबई या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या नेहमी प्रवाशांनी भरलेल्या असतात. अशावेळी कोल्हापूर मुंबई मार्गावर तातडीने ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करावे.

रुकडी आणि वळीवडे थांबे पूर्ववत करावे (Vande Bharat Express)

तसेच रुकडी आणि वळीवडे या दोन रेल्वे स्टेशनच्या बाबतीत थांबे पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हंटले आहे की बहुतेक सर्व रेल्वे गाड्या ज्या कोल्हापूर स्थानकावरून सुटतात त्या रेल्वे गाड्या वळीवडे आणि रुकडी या स्थानकांवर थांबत होत्या मात्र कोरोना काळात रेल्वे बंद झाल्यानंतर हे थांबे पुन्हा सुरू करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

डेमो ट्रेन

शिवाय निवेदनात पुढे म्हंटले आहे की रेल्वेचा पुणे विभाग मनमाड पर्यंत विस्तारित केला तर कोल्हापूरहून शिर्डी साईनगर पर्यंत एखादी विशेष रेल्वे (Vande Bharat Express) सुरू करता येईल. त्यातून हजारो भाविकांना मोठी सुविधा निर्माण होईल. तसंच सध्या मिरज ते परळी या मार्गावर डेमो ट्रेन सुरू आहे ही गाडी कोल्हापूर वरून सुरू करावी अशी मागणी देखील त्यांनी आपल्या निवेदनामध्ये केली आहे.

काय आहेत इतर मागण्या ? (Vande Bharat Express)

कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्सप्रेस मध्ये होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करतात या गाडीमध्ये चार जनरल डबे वाढवावेत.
कोल्हापूर ते सांगली दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे आधुनिकीकरण करावं.
अमृतभारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभा करावा.

सध्या कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते धनबाद या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या कोल्हापुरात (Vande Bharat Express) आल्यावर 48 तास थांबून असतात अशावेळी या रेल्वे गाड्या सोलापूर किंवा कलबुर्गी मार्गावर सोडता येतील का याचाही विचार करावा या सर्व मुद्द्यांचा व मागण्यांचा सकारात्मक विचार करून कार्यवाही केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार महाडिक यांना सांगितलं