vande bharat express : वंदे भारत ट्रेन भारतात अतिशय लोकप्रिय ठरली आहे. आरामदायी आणि वेगवान तिची ओळख आहे. आता वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.जर तुम्ही शाकाहारी असाल, तर आता तुम्हाला या ट्रेनमधील जेवणाबाबत कसलाही प्रश्न पडणार नाही. नवी दिल्ली ते कटरा (श्री माता वैष्णो देवी) जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता फक्त शाकाहारी जेवणच दिले जाणार आहे.
मांसाहारी जेवणावर निर्बंध का? (vande bharat express)
या ट्रेनमध्ये आधी वेज आणि नॉनवेज दोन्ही प्रकारचे अन्न उपलब्ध होते, त्यामुळे शुद्ध शाकाहारी लोक चिंतेत असायचे.त्यामुळेच, रेल्वेने या ट्रेनमध्ये 100% शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्री माता वैष्णो देवी मंदिर हे एक पवित्र धार्मिक स्थळ आहे.नवी दिल्ली ते कटरा या सेमी-हाय-स्पीड ट्रेनमध्ये संपूर्ण शाकाहारी वातावरण राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला (vande bharat express) आहे. त्यामुळे, या ट्रेनमध्ये मांसाहारी अन्न किंवा स्नॅक्स नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
‘सात्विक’ प्रमाणपत्र मिळणारी पहिली ट्रेन (vande bharat express)
भारतीय रेल्वे प्राधिकरण IRCTC आणि सात्विक काउंसिल ऑफ इंडिया यांच्यातील करारानुसार दिल्ली-कटरा वंदे भारत एक्सप्रेसला ‘सात्विक प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे. IRCTC ने काही निवडक धार्मिक मार्गांवरील ट्रेनसाठी ‘सात्विक प्रमाणन’ लागू केले आहे. २०२१ मध्ये हा ‘सात्विक प्रमाणपत्र’ उपक्रम सुरू करण्यात आला.
प्रवाशांमध्ये वाढत आहे आरोग्य जागरूकता
रेल्वे आता कमी कॅलोरीचे अन्न, ग्लूटेन-फ्री स्नॅक्स आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंग यासारखे (vande bharat express)आरोग्यदायी पर्याय देत आहे. या बदलामुळे प्रवाशांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल तसेच पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होईल. नवीन नियमानुसार प्रवास करण्यापूर्वी तयारी करा आणि शाकाहारी आहाराचा आनंद घ्या




