व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Vande Bharat Express केसरी रंगातच का आणली? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसमधून (Vande Bharat Express) प्रवास करण्यासाठी वाढती मागणी पाहता भारतीय रेल्वेने गेल्या काही दिवसात नवनवीन मार्गावर वेगवेगळ्या वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या आहेत. भारतीय रेल्वेने (Indian Railways) वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या रचनेत आणि लूक मध्येही काही बदल केले आहेत. आधी वंदे भारत रेल्वे ही पांढऱ्या आणि निळ्या रंगात होती मात्र आता काही ठिकाणी केसरी रंगातील वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाने वंदे भारत एक्सप्रेससाठी केसरी रंगच का निवडला असेही प्रश्न यामुळे उपस्थित करण्यात आले. याला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले आहे.

हे आहे वैज्ञानिक कारण – (Vande Bharat Express)

नवीन  केसरी रंगातील वंदे भारत एक्सप्रेस ही केरळमधील कासरगोड ते तिरुवंअनंतपुरमच्या दरम्यान चालवली जाते. या एक्सप्रेसच्या रंगाबद्दल मा.अश्विनी वैष्णव म्हणाले की, नवीन वंदे भारत एक्सप्रेसच्या केसरी रंगामध्ये कुठल्याही पद्धतीचे राजकारण दडलेले नसून त्यामागे वैज्ञानिक कारण  आहे. मानवी  डोळ्यांना दोन रंग सगळ्यात पटकन दिसतात  त्यामध्ये केसरी आणि पिवळा हे दोन रंग येतात. युरोपातील 80 % रेल्वे गाड्यांना पिवळा व केसरी रंग दिलेला आहे. मानवी डोळ्यांसाठी पिवळा आणि केसरी  रंग  चांगले  मानले जातात. विमानातील ब्लॅक बॉक्स देखील केसरी रंगाचा असतो . कारण  तो आपल्या डोळ्यांना पटकन दिसतो . त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस देखील केसरी रंगात रंगावण्यात आली आहे.

आत्तापर्यंत वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये चालवली जात आहे.ज्यात आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि आसाम. याचा  समावेश  आहे. त्यामध्ये केरळातील एकमेव केसरी वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. भविष्यात लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचे  स्लीपर व्हर्जन भारतातील रेल्वे रुळावर दिसेल.