vande bharat express : महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे आहेत आणि या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेकांची दररोज ये-जा होत असते. त्यातही या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना कनेक्ट करण्यासाठी ट्रेन, विमानासह इतरही वाहतुकीच्या सुविधा आहेत. मात्र त्यातल्या त्यात ट्रेन ही स्वस्तात मस्त असलेली महत्त्वाची सुविधा प्रवाशांकरिता आहे. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची आणि आरामदायी सफरीचा आनंद देणारी ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ला देशभरामध्ये मोठी मागणी आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रातही अनेक मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरु झाल्या आहेत. आता मुंबई आणि पुणे या मार्गावरून वंदे भारत एक्सप्रेस ने (vande bharat express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई आणि पुण्याला आणखी एक एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊयात या नव्या वंदे भारत संदर्भात.
मुंबई ते अमरावती आणि पुणे ते अमरावती दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस नव्याने सुरू होणार असून याबाबतचा संभाव्य वेळापत्रक देखील प्रसार माध्यमांमधून समोर आला आहे. या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस मुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जनतेला जलद गतीने महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या शहरांना चांगली कनेक्टिव्हिटी (vande bharat express)मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही मार्गावरील वंदे भारत ट्रेन सुरू व्हावी याकरिता रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी अर्ज पाठवण्यात आला होता. त्यामुळे आता रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून पुणे ते अमरावती आणि मुंबई ते अमरावती हा प्रवास वंदे भारत एक्सप्रेस ने करता येणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकावरून धावणार आहेत. याबरोबरच या दोन्ही गाड्यांना उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देखील मंजूर केले जाऊ शकतील असा अंदाजही व्यक्त करण्यात येतो आहे.
काय असेल वेळापत्रक (vande bharat express)
मुंबई-अमरावती
मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत ट्रेन अमरावती रेल्वे स्थानकावरून 3 वाजून 40 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि ही गाडी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी मुंबई येथे पोहोचणार आहे. याचबरोबर ही ट्रेन अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक या रेल्वे स्थानकांवर थांबा घेणार आणि नंतर मुंबईला येणार आहे. तर मुंबईहून ही गाडी दुपारी 15 वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहे आणि 23 वाजून 25 मिनिटांनी अमरावती येथे पोहोचणार आहे.
पुणे-अमरावती (vande bharat express)
मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी अमरावती वरून पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी सोडली जाणार आहे. अमरावती वरून सुटल्यानंतर ही गाडी अकोला,भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड रेल्वे स्थानकांवर थांबा घेणार आहे. आणि दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी हे गाडी पुण्याला पोहोचेल. तर दुपारी 15 वाजून 40 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरून ही गाडी सुटेल आणि रात्री 23 वाजून 45 मिनिटांनी अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.