Vande Bharat Express : पुण्याला मिळणार अजून एक वंदे भारत एक्सप्रेस; पहा कसा असेल रुट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express | पुणे (Pune) हे शिक्षणाचे माहेरघर तर आहेच त्याचबरोबर पुणे हे मेट्रोचे शहर म्हणून देखील ओळखले जात आहे. असे असताना आता पुण्याला वंदे भारत ट्रेन मिळावी अशी मागणी केली जात होती. त्यामुळे पुण्याला मुंबई ते सोलापूर दरम्यान चालवली जाणारी गाडी पुणे मार्गे सुरू करण्यात आली आहे. परंतु ही ट्रेन थेट पुण्यावरून नव्हती. मात्र आता पुणेकरांसाठी नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. या ट्रेनचा रूट कसा असेल जाणून घेऊयात.

सिकंदराबाद मार्गावरून असेल ट्रेन- Vande Bharat Express

पुण्याला मिळणारी ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून चालवली जाणार आहे. ही गाडी पुणे ते सिकंदराबाद अश्या मार्गावर चालवली जाणार आहे. याआधी या मार्गावर शताब्धी एक्सप्रेस चालवली जात होती. मात्र आता या गाडीला पूर्णविराम दिला जाणार असून त्याजागी वंदे भारत एक्सप्रेसला स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास हा अत्यंत सोयीचा व जलद होणार आहे.

2024 मध्ये मिळणार वंदे भारतची भेट

पुण्याला दुसरी वंदे भारत ट्रेन दिली जाणार असल्याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसापासून सुरु होत्या. आता त्यास पूर्णविराम लागणार असून दक्षिण रेल्वेच्या योजनेनुसार या नवीन वर्षात म्हणजेच 2024 मध्ये वंदे भारतची (Vande Bharat Express) भेट दिली जाणार आहे. ही गाडी केव्हा सुरु होणार याबाबत अजूनही माहिती समोर आली नाही. परंतु जेव्हा देशाची हाय – स्पीड ट्रेन पुण्यात धावेल तेव्हा नक्कीच त्याचा फायदा पुणेकरांसोबत इतर ठिकाणालाही होणार आहे हे नक्की.