Vande Bharat Express शेगावसाठी धावणार; गजानन महाराजांच्या भक्तांचा प्रवास होणार सुखकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेगाव म्हणलं की आपल्यासमोर उभी ठाकते ती गजानन महाराजांची मूर्ती आणि तेथील असलेले स्वच्छता. दररोज या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे येथील गर्दीही तितकीच जास्त असते. त्याचप्रमाणे केवळ भाविकच नव्हे तर विविध शालेय सहल देखील येथे येत असतात. त्यामुळे शेगाव हे पूर्ण पंचक्रोशीत ज्ञात आहे. आता याच ठिकाणी देशाची सुपरफास्ट Vande Bharat Express धावणार आहे. त्यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांचा प्रवास आणखी सुखकर आणि आरामदायी होण्यास मदत मिळणार आहे.

मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव दरम्यान चालवली जाणार ट्रेन-

भारतात सध्या एकूण 34 वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) असून मध्य रेल्वेकडे एकूण 5 वंदे भारत आहेत. त्यामध्ये मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदूर दरम्यान धावतात. त्यातच आता मध्य रेल्वेकडून मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव दरम्यान वंदे भारत चालवण्याचा प्रस्ताव काढण्यात आला आहे. त्यामुळे ही ट्रेन लवकरच शेगावला धावताना आपल्याला दिसेल. रेल्वे विभागाच्या निर्णयामुळे भक्तांना प्रवासासाठी अजून एक सोयीचा मार्ग मिळणार आहे.

2024 पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळांना जोडणार वंदे भारत- Vande Bharat Express

येत्या नवीन वर्षात अनेक नवीन बदल होणार आहेत. त्यातील एक म्हणजे वंदे भारत ट्रेन ही 2024 मध्ये देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळांना जोडणार आहे. त्यासाठी 30 ते 35 वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या चालवण्याच्या योजनेवर रेल्वे मंत्रालय काम करत आहे. शेगाव प्रमाणेच नवीन वर्षात रेल्वेमंत्रालयाने ठरवलेल्या प्लॅनींगनुसार सर्व काही झाले तर वंदे भारत ट्रेनला नवीन वर्षात बहुतांश पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे ही सर्व भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. यामुळे भाविकांचा प्रवास सोयीचा होईलच त्याचबरोबर रेल्वेचा महसूलही वाढेल.

कोणत्या भागात चालवली जाणार ट्रेन?

भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) ही कोणत्या भागात चालवता येईल याबाबत सूचना मागितल्या आहेत. त्यामध्ये मध्य रेल्वेने 331किलोमीटर अंतराच्या मुंबई ते संभाजीनगर, 562.9  किमी अंतराच्या पुणे ते सिकंदराबाद, 554 किलोमीटर अंतराच्या मुंबई ते शेगाव आणि 470 किलोमीटर अंतराच्या पुणे ते शेगाव रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन चालविली जाईल. याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील तब्बल 1 हजार 309  रेल्वे स्थानकांचा कायपालट करण्याचा भारतीय रेल्वेने निर्णय घेतला आहे. यामध्ये शेगाव रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे.