Vande Bharat Express : पूर्णपणे स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस आता देशभर प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. एवढेच नाही तर देशभरातून या रेल्वेसाठी मागणी देखील होत आहे. दरम्यान वंदे भारत रेल्वे बाबत एक नवी माहिती समोर आली आहे. तुम्हाला माहितीच असेल मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित असून याचे काम वेगाने सुरु आहे. पण आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारतीय रेल्वेने 9 ऑगस्ट रोजी 20 डब्यांसह पहिल्या वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat Express) यशस्वी ट्रायल घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार , दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता अहमदाबाद येथून 20 कोच असलेली पहिली वंदे भारत ट्रेन रवाना झाली. अहमदाबाद ते वडोदरा, सुरत असे स्टेशन्स पार करत दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी ही ट्रेन मुंबई सेंट्रलला पोहोचली. अशाप्रकारे या ट्रेनची ट्रायल रन यशस्वीपणे पार पडली. तसे पाहायला गेल्यास देशातल्या मोठ्या शहरांमध्ये वंदे भारत ट्रेनचे 16 तर छोट्या शहरांमध्ये आठ कोच असलेली ट्रेन चालवली जाते. तर अहमदाबाद ते मुंबई (Vande Bharat Express) यांच्या दरम्यान सध्या 16 -16 कोच असलेली वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) सुरू आहे. तर अहमदाबाद पासून 20 कोचेस असलेली वंदे भारत ट्रेन सोडण्यात येणार आहे. ट्रायल रन घेतलेल्या ट्रेनमध्ये 14C+ 2E आणि 4चा असे कोच जोडले गेले आहेत.
देशभरातून वंदे भारत एक्सप्रेसला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता 20 कोच असलेली वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी ट्रायल रन घेण्यात आली. सध्या असलेल्या 16 कोचच्या डब्यांना अधिकचे डबे जोडून 20 कोच असणारी ट्रेन तयार केली गेली असून त्याचे स्पीड हे 130 किलोमीटर (Vande Bharat Express) प्रति तास आहे. अशा या ट्रेनची ट्रायल रन घेताना जास्त कोच जोडल्याने त्याच्या स्पीड मध्ये कोणता फरक पडतो का ? याची चाचणी देखील करण्यात आली. शिवाय ही गाडी किती वेळात मुंबईपर्यंत पोहोचते हे सुद्धा पडताळण्यात आलं?
या यशस्वी ट्रायल रन नंतर या मार्गावर जादा कोच असलेली वंदे भारत एक्सप्रेस सुरु होण्याची (Vande Bharat Express) अपेक्षा आहे.