अल्पावधीतच लोकप्रियतेचा शिखर गाठलेली ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आता देशातल्या अनेक भागांमध्ये पोहोचणार आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार 15 सप्टेंबर रोजी देशात नव्या दहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. यामध्ये पुणे ते नागपूर अशी एक वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा धावणार आहे. तर दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकला जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस मंजूर केली आहे.
ही वंदे भारत एक्सप्रेस हुबळी ते पुणे (२०६६९) आणि पुणे ते हुबळी (२०६७०) असा प्रवास करणार असून या गाड्यांमुळे मिरज सांगली आणि सातारा येथील प्रवाशांना फायदा होणार आहे. याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयांना प्रसिद्ध केली आहे.
मागणी झाली मान्य
यापूर्वी पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून सांगली व मिरज येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्टचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर सुरू करण्याची मागणी रेल मंत्रालयाकडे केली होती. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबण्याची विनंती रेल्वे कडे केली होती. या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी पुणे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेसना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा देखील मंजूर केला आहे.
काय असेल वेळापत्रक
हुबळीहुन पहाटे पाच वाजता वंदे भारत एक्सप्रेस सुटणार असून धारवाडला ही गाडी पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल. बोळगाव ला ही गाडी सहा वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. तर मिरजेत हे गाडी 9:15 पोहोचणार आहे. सांगलीमध्ये ही गाडी नऊ वाजून तीस मिनिटांनी पोहोचणार आहे तर सातारा स्थानकावर ही गाडी 10 वाजून 35 मिनिटांनी तर पुण्यात दीड वाजता पोहोचेल.
पुण्याहून हुबळीला जाणाऱ्या गाडीबद्दल सांगायचं झाल्यास दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याहून हुबळी करता सुटणार आहे. सातारा इथं चार वाजून आठ मिनिटांनी ही गाडी पोहोचेल. सांगलीत सहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. तर मिरजमध्ये ही गाडी सहा वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर बेळगावला ही गाडी 8 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. शिवाय धारवाडला ही गाडी दहा वाजून वीस मिनिटांनी तर हुबळीत ही गाडी रात्री पावणे अकरा वाजता पोहोचेल.
किती वेळात होणार प्रवास ?
या नव्या मध्ये भरत एक्सप्रेस मुळे पुणे ते सांगली हा प्रवास केवळ तीन तास 55 मिनिटांचा होणार आहे. तर सांगली ते बेळगाव दोन तास 23 मिनिटात गाठता येणार आहे. तसंच सांगली ते हुबळी हा प्रवास चार तास 33 मिनिटांचा असेल तर बेळगाव ते हुबळी हा प्रवास दोन तास दहा मिनिटांचा असेल आणि पुणे ते हुबळी हा प्रवास साडेआठ तासाचा असेल.
काय आहेत वैशिष्ट्ये ?
- मिळालेल्या माहितीनुसार ही वंदे भारत एक्सप्रेस आठ कोचची असून पूर्णपणे वातानुकूलित असेल.
- सोमवार सोडून ही गाडी दररोज धावणार आहे.
- या गाडीच्या वेगाबद्दल सांगायचं झाले 66 किलोमीटर प्रति तास या गाडीचा वेग असेल
- पुणे -हुबळी अंतर 558 किलोमीटर इतके असेल.