महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेन ‘या’ 10 ठिकाणी थांबणार; पहा तिकीटांचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे म्हंटले की, बस, विमान यापेक्षा ट्रेनचा प्रवास हा कधीही चांगला आणि स्वस्त मानला जातो. भारतीय रेल्वे सुरु आहेत. आता नव्याने वंदे भारत ट्रेनची सुरुवात महाराष्ट्रात होत असून हि ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी धावणार आहे. हि वंदे भारत ट्रेन पुणे, नाशिक व शिर्डीसह एकूण 1 स्थानकांवर थांबणार आहे. पाहूया या ट्रेनचे काय आहेत तिकीट दर….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण होणार आहे. मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुणे रेल्वे स्टेशनवरुन जाणार आहे. मुंबई ते सोलापूर व्हाया पुणे ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनहून दररोज सुटेल. ही गाडी मुंबई, पुणे आणि शिर्डीमार्गे सोलापूरकडे रवाना होईल. मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 1 तास 50 मिनिटात पूर्ण केले जाईल. ही या दोन शहरांदरम्यान धावणारी पहिली वंदे भारत ट्रेन असेल.

मुंबई आणि सोलापूर दरम्यान 10 थांबे

सध्या मुंबई ते गांधीनगर दरम्यान केवळ एक वंदे भारत ट्रेन धावत आहे. ही दुसरी वंदे भारत ट्रेन असेल जी आढवड्यातून सहा दिवस धावेल, ज्यामध्ये मुंबई आणि सोलापूर दरम्यान 10 थांबे असतील. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार ट्रेन सीएसएमटीहून सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि रात्री 10.40 वाजता सोलापूर स्टेशनवर दाखल होईल. दुसऱ्या दिवशी सोलापुरातून सकाळी 6.05 वाजता रवाना होईल व दुपारी 12.10 वाजता मुंबईत पोहोचेल.

Vande Bharat

मुंबई ते सोलापूर व्हाया पुणे व शिर्डी अशी धावणाऱ्या ट्रेनमधून प्रवाशांचा सुखकर प्रवास होणार आहे. मुंबई ते शिर्डी धावणाऱ्या ट्रेनचे दरही प्रशासनाकडून ठरवण्यात आलेले आहेत. हि मुंबई ते शिर्डी ट्रेन सकाळी 6:15 ला सुटणार असून शिर्डीत रात्री 12:10 वाजता पोहचेल. तसेच शिर्डी ते मुंबई धावणारी ट्रेन शिर्डीतून सायंकाळी 5:25 ला सुटणार असून मुंबईत रात्री 11:18 वाजता पोचणार आहे. ट्रेनचे तिकीट भाडे हे जास्त ठेवण्यात आलेले नाही. चेअर कारसाठी 800 ते 1000 रुपये तर एक्सएकटीव्हसाठी 1600 ते 1800 रुपये.

Vande Bharat

मुंबई-सोलापूर दरम्यान वंदे भारतचे तिकीट दर –

मुंबई ते पुणे चेअर कारसाठी 560 रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1135 रुपये.

मुंबई ते नाशिकसाठी चेअरकारसाठी 550 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1150 रुपये.

मुंबई ते सोलापूर चेअर कारसाठी 965 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1070 रुपये.