Vande Bharat Express : काय सांगता ! मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express : पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी ही ट्रेन ओळखली जाते. देशभरातून विविध मार्गावर प्रवाशांकडून या गाडीला मोठी मागणी आहे. आता वंदे भारतच्या प्रवाशांकरिता आणखी एक खुशखबर आहे. रेल्वे प्रवासी ज्या गाडीची आतुरतानं वाट पाहत आहेत अशी वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर वर्जन (Vande Bharat Express ) आता लवकरच लॉन्च होणार आहे.

ऑगस्ट महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन लॉन्च होणार असे खात्रीलायक वृत्त आता समोर आले आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे नक्कीच आनंदाची बाब मानायला हवी. खास गोष्ट म्हणजे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे असा दावा होत आहे. ही गाडी मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाणार असं बोललं जात असतानाच आता मुंबईला आणखी एक बंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Express ) मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागाला येत्या तीन ते चार महिन्यात स्लीपर वंदे भारत मिळणार आहे. ही वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस बरेली ते मुंबई दरम्यान चालवली जाणार आहे. यासाठी बरेली आणि मुंबई दरम्यानचे वेगवेगळे रेल्वे विभाग सर्वेक्षण करत आहेत आणि अहवाल तयार करत आहेत. सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे बोर्ड बोर्डाकडे पाठवला जाणार आणि त्यानंतर वंदे भारत स्लीपर ट्रेनचे (Vande Bharat Express ) वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल अशी माहिती समोर आली आहे.

कसा असेल मार्ग?

14 जुलै 2024 रोजी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बरेली ते मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस चालवण्याबाबत मुरादाबाद आणि इज्जत नगर विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. रेल्वेच्या (Vande Bharat Express ) अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन ते तीन महिन्यात मुरादाबाद विभागातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस बरेली आणि मुंबई दरम्यान सुरू केली जाईल. हा जवळपास 1600 किमीचा मार्ग असेल याचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

या स्थानकांचा असेल समावेश (Vande Bharat Express )

ही गाडी बरेली, चंदौसी ,अलिगड, आग्रा ,ग्वाल्हेर, झाशी ,बिना, भोपाळ, इटारसी, खंडवा, जळगाव ,मनमाड, मुंबई अशी चालवली जाणार आहे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा रिपोर्ट रेल्वे बोर्डाकडे सादर होणार आहे.