Vande Bharat Express : स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र आता मागच्या काही दिवसांत या ट्रेन बाबत तक्रारी सोशल मीडियावर यायला लागल्या आहेत . यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये अन्नात अळी सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सध्या पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्वत्र पाऊस पडतो आहे. मात्र नावाजल्या गेलेल्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मध्ये सुद्धा पावसामुळे गळती लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यानंतर प्रवाशांनी ट्रेनच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
काय आहे व्हिडीओ ? (Vande Bharat Express)
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रेनच्या छतावरून खूप पाणी गळत असल्याचं पाहायला मिळत आहे. फ्लोअरही पाण्याने पूर्णपणे ओले झाले आहे. शिवाय सीट्स वरही पाणी टपकत आहे. लोकांना नाइलाजास्तवर ओल्या झालेल्या सीटवर बसावे लागत आहे. साहजिकच अशा पाण्याच्या गळतीमुळे लोकांना त्रास होत आहे.
प्रिया सिंह यांनी हा व्हिडिओ त्यांच्या X च्या हँडल @priyarajputlive वर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना प्रिया यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे – “वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat Express) स्थिती पहा. ही ट्रेन दिल्ली-वाराणसी मार्गावर धावते. वंदे भारत क्रमांक २२४१६ आहे”. या व्हिडिओला आतापर्यंत 26 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे – ‘अशा परिस्थितीत विजेचा धक्का बसण्याचा धोका आहे सावधान’…! आणखी एका युजरने लिहिले आहे – ‘मेड इन इंडिया फक्त भारतीय लोकांसाठी’ .
वंदेभारत ट्रेन का हाल देखिए
— Priya singh (@priyarajputlive) July 2, 2024
ये ट्रेन दिल्ली-वाराणसी रुट पर दौड़ती है.
वंदेभारत का नंबर है 22416. pic.twitter.com/uMO8I65FZa
रेल्वे विभागाचेही उत्तर (Vande Bharat Express)
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर रेल्वेने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले -” पाईपमध्ये तात्पुरता अडथळा आल्याने डब्यात काही प्रमाणात पाणी गळती झाल्याचे दिसले! ही बाब ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली आणि दुरुस्त करण्यात आली. झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व”