देशभरात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्सला चांगली पसंती मिळत आहे. अशातच पुणेकरांसाठी साठी एक आनंदाची बातमी असून पुण्याच्या ट्रॅक वर आता आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेस 15 सप्टेंबर पासून धावणार असून या रेल्वेला आठ डबे असणार आहेत. ही वंदे भारत एक्सप्रेस अद्यावत असणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा होती ही गाडी आता अखेर सुरू होणार असून हुबळी पर्यंत प्रवास करत असताना अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. चला जाणून घेऊया या खास वंदे भारत एक्सप्रेस बाबत…
मिळालेल्या माहितीनुसार पुणे स्थानकावर सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी ऑनलाइन पद्धतीने याचा उद्घाटन सोहळा असणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही रेल्वे पुणे विभागाची नसून हुबळी विभागाची असणार आहे. त्यामुळे या ट्रेनची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही हुबळी विभागाची असणार आहे. पुण्यात वंदे भारत एक्सप्रेस दाखल झाल्यानंतर मात्र डब्याची स्वच्छता केली जाणार आहे.
काय आहे वेळापत्रक?
पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस हुबळी स्थानकामधून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुटणार आहे. मिरजेमध्ये ही गाडी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचणार आहे तर पाच मिनिटांचा थांबा घेऊन कोल्हापूरला दहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचणार आहे. कोल्हापूरला पंधरा मिनिटांचा थांबा ही गाडी घेईल त्यानंतर दहा वाजून 30 मिनिटांनी कोल्हापूरहून सुटेल आणि पुन्हा मिरजला सकाळी 11:15 मिनिटांनी येईल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही गाडी पुण्यात पोहोचेल तर पुण्याहून दुपारी चार वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि मिरजेला नऊ वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल हुबळीला रात्री एक वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी पोहोचणार आहे.
110 किमी प्रतितास इतका वेग
मिळालेल्या माहितीनुसार या गाडीचा वेग हा ताशी 110 km इतका ठरवण्यात आला आहे मात्र काही मोजक्या ठिकाणी या वेगाने ही गाडी धावेल पुणे ते सातारा सेक्शन मध्ये काही छोट्या स्थानकांत 55 किलोमीटर प्रतितास वेगानं ही रेल्वे धावणार आहे.