हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लवकरच रेल्वे विभागाकडून वंदे भारतचे स्लीपर कोचचे व्हर्जन लॉन्च करण्यात येणार आहे. नुकतीच या संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. यापूर्वी वंदे भारतमध्ये (Vande Bharat) केवळ चेअरकार असल्याने रात्रीच्या प्रवासासाठी झोपून जाण्याची सोय नव्हती. त्यामुळेच आता वंदे भारतची स्लीपर कोच तयार करण्यात येत आहे. या स्लीपर कोचमध्ये 16 डब्बे असणार आहेत. यात 11 एसी 3 टायर, चार एसी 2 टायर आणि एक एसी फर्स्ट क्लास असे डब्बे असतील. या डब्यांना भविष्यात 20 ते 24 पर्यंत वाढवण्याची देखील सोय असणार आहे.
स्लीपर कोच कधी येणार? (Vande Bharat)
टाइम्स इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरी आणि चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये वंदे बाहेरसाठी स्लीपर कोच तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात वंदे भारतचे दोन रेक कारखान्यातून बाहेर पडतील. त्यानंतर अन्य स्लीपर कोच दुसऱ्या टप्प्यामध्ये बाहेर पडतील. ही माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी आर.एन.तिवारी यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, या वर्षात रायबरेलीच्या एमसीएफ येथील कारखान्यात वंदे भारतच्या एसी आणि नॉन एसी कोचच्या पुश एण्ड पुल ट्रेनची निर्मिती करण्यात येणार आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वीच अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वंदे भारत ट्रेन संदर्भात मोठी घोषणा केली आहे. वंदे भारतच्या धर्तीवर आणखीन 40 हजार रेल्वे सामान्य डब्यातून वंदे भारतमध्ये परिवर्तित करण्यात येतील असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. यामुळे कॉरिडॉरवरील ट्रॅफीक कमी होईल अशी सरकारला आशा आहे. याचबरोबर पुढील काळात वंदे भारत मध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा देखील वाढवण्यात येते. ज्यामुळे वंदे भारतचा (Vande Bharat) प्रवास सुलभ होईल.