Vande Bharat Sleeper : मुंबईला मिळणार 2 स्लीपर वंदे भारत ट्रेन; कसा असेल रूट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Sleeper | मुंबईची ट्राफिक म्हणजे डोकेदुखी. त्यामुळे याचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वेचे आणि मेट्रोचे जाळे कसे वाढवता येतील याकडे रेल्वेचे लक्ष आहे. त्यासाठी तसे प्रयत्नही सुरु आहेत. मुंबई ते जालना या मार्गावरील वंदे भारतचे नुकतेच उदघाटन झाले आहे. त्यामुळे प्रवासाला गती मिळाली आहे. त्यातच आता मुंबईला अजून दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. हा रेल्वेमार्ग कसा असेल याबाबत आज आपण जाणून घेऊयात…..

वंदे भारत एक्सप्रेसला लोकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Sleeper) सुरु करण्याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. तसेच पहिली  वंदे भारत स्लीपर ही देशाची आर्थिक राजधानी मुंबईतुन धावणार असेही सांगितले जात होते आणि अखेर या चर्चेला पूर्णविरामन लागणार आहे. कारण येत्या मार्च महिन्यात ही गाडी प्रवाश्यांच्या सेवेत केव्हाही रुजू होण्याची शक्यता आहे.

कसा असेल रूट? Vande Bharat Sleeper

वंदे भारत स्लीपर ट्रेनचा रूट नेमका कोणता असेल असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. तर यामध्ये या गाडीचा रूट हा मुंबई ते जोधपूर आणि मुंबई ते दिल्ली या मार्गावर सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांचा राजस्थान आणि दिल्लीचा प्रवास हा अधिक चांगला होऊ शकतो.

राजधानी एक्सप्रेसपेक्षा 20 टक्के जास्त असणार भाडे

वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी (Vande Bharat Sleeper) तर सारेच उत्सुक आहेत. मात्र या गाडीचे भाडे किती असणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. या गाडीचे भाडे हे राजधानी एक्सप्रेसपेक्षा 20 टक्के जास्त राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई मध्ये सर्व प्रथम धावणारी ही वंदे भारत स्लीपर ट्रेन ही पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. त्याचबरोबर स्लीपर गाडीमध्ये हायटेक फिचर्स राहणार आहेत. ज्यामुळे प्रवाश्यांना हव्या असणाऱ्या सुविधा येथे उपलब्ध होतील आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल.