Vande Metro : आता देशात धावणार Vande Metro; 124 शहरांना जोडणार, स्पीड किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. सरकारने नवनवीन प्रकारच्या ट्रेन लाँच करत देशातील वाहतूक आणखी गतिमान केलं आहे. वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत आणि वंदे भारत साधारण रेल्वेच्या यशानंतर भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत मेट्रो (Vande Metro) सुरू करण्याची योजना आखत आहे. ही वंदे भारत मेट्रो जुलै 2024 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, वंदे भारत मेट्रोची सर्व तयारी सुरू असून जुलै 2024 पासून तिची ट्रायल साठी सुरू करण्यात येईल . या वंदे भारत मेट्रो मध्ये जलद गतीसाठी आणि स्पीड कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. ऑटोमॅटिक उघडणारे दरवाजे, आरामशीर जागा, यासारखे अनेक फीचर्स या वंदे भारत मेट्रो मध्ये देण्यात येतील जे याआधीच्या मेट्रोमध्ये प्रवाशांना मिळत नव्हते. ही पूर्णपणे वातानुकूलित वंदे मेट्रो ताशी 130 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकणार आहे.

कशी असेल रचना – Vande Metro

माहितीनुसार, वंदे भारत मेट्रोला (Vande Metro) एक विशिष्ट कोच कॉन्फिगरेशन असेल. यातील प्रत्येक युनिटमध्ये चार डबे आणि किमान 12 डब्बे असू शकतात. सुरुवातीला, या वंदे भारत मेट्रो मध्ये कमीत कमी 12 वंदे मेट्रो कोच असतील परंतु नंतर त्या त्या रूट वरील गरजेनुसार, याच कोचचा विस्तार 16 डब्यांपर्यंत होण्याची शक्यता आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘वंदे भारत मेट्रो ट्रेन देशभरातील सुमारे 124 शहरांना जोडेल. यामध्ये लखनौ-कानपूर, आग्रा-मथुरा, दिल्ली-रेवाडी, भुवनेश्वर-बालासोर आणि तिरुपती-चेन्नई रूटचा समावेश असण्याची शक्यता आहे.