Vantara Project : अनंत अंबानींचा प्रकल्प ‘वनतारा’ ठरतोय वन्य जीवांसाठी आश्रयस्थान; 200 पेक्षा जास्त हत्तींचे वाचवले प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vantara Project) गेल्या काही काळात जंगलांची अमर्याद तोड झाल्याने मुक्या वन्यजीवांचा निवारा नाहीसा होऊ लागला आहे. प्रत्येकासाठी जमीन ही मौल्यवान वस्तू झाली आहे आणि अशातच अनंत अंबानी यांनी ३००० एकर क्षेत्र जनावरांसाठी समर्पित केले आहे. होय. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी आपला ड्रीमप्रोजेक्ट पूर्ण केला आहे. ज्याचे नाव आहे ‘वनतारा’.

(Vantara Project) गुजरात, जामनगर येथे ‘वनतारा’ हा ड्रीम प्रोजेक्ट सुरु केला जात आहे. निसर्गाला अभिवादन करून मुक्या जीवांच्या संवर्धनासाठी हा प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. अत्यंत लक्षवेधी असे नाव असणारा हा प्रोजेक्ट नेमका काय आहे? आणि याची वैशिट्ये काय आहेत? याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊयात.

वनतारा म्हणजे काय? (Vantara Project)

‘वनतारा’ या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे. वन आणि तारा या दोन शब्दांचा मिलाफ अर्थात वनतारा ज्याचा अर्थ होतो ‘जंगलातला ताराट. या प्रोजेक्ट अंतर्गत रिलायन्स ग्रुपने वन्य जीवांना लक्षात घेऊन मोठा उपक्रम सुरू केला आहे. निसर्गाचा एक अविभाज्य भाग म्हणजे प्राणी. ज्यांच्यासाठी अंबानींनी प्रकल्प वनतारा सुरू केला आहे.

कुठे उभारला वनतारा?

अनंत अंबानी यांनी रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी परिसरात हा प्रकल्प सुरु केला आहे. वनतारा हा सुमारे ३००० एकरांवर पसरलेला एक हरित पट्टा आहे. ज्यामध्ये जगभरातील प्राणी आणि वन्यजीवांचे संवर्धन केले जाणार आहे.

वनताराचा उद्देश

अनंत अंबानी यांच्या वनतारा या ड्रीमप्रोजेक्टचा मुख्य उद्देश म्हणजे, एखादा जखमी प्राणी देशात असो वा परदेशात, त्याचे तात्काळ संरक्षण करणे. (Vantara Project) तसेच संकटात सापडलेल्या प्राण्याला धोक्यापासून वाचवणे आणि त्याचे नैसर्गिक अधिवासात पुर्नवसन करणे हा या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे. मुक्या प्राण्यांना अत्याधुनिक सेवा देण्यापेक्षा आणखी चांगले काय असू शकते. म्हणून याठिकाणी प्राण्यांसाठी उत्कृष्ट रुग्णालय बांधण्यात आले आहे. जिथे जखमी प्राण्यांवर उपचार कारले जातील आणि त्यांची काळजी घेतली जाईल.

वनताराच्या माध्यमातून २०० पेक्षा जास्त हत्तींना वाचवलं

अनंत अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनतारा अंतर्गत आतापर्यंत २०० हून अधिक जखमी हत्तींचे बचाव कार्य करण्यात आले आहे. देशात कुठेही एखादा हत्ती जखमी झाला असेल तर तो जामनगर येथील वनतारा प्रकल्पात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. (Vantara Project) या ठिकाणी जखमी हत्तींना आणून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात. तसेच येथील ६०० एकर क्षेत्र केवळ हत्तींसाठी त्यांचे नैसर्गिक अधिवास म्हणून विकसित केले गेले आहे.

काय म्हणाले अनंत अंबानी?

‘वनतारा’ मध्ये रिलायन्स फाऊंडेशनचे काही वचनबद्ध लोक यात सामील असून ही टीम सध्या गंभीर जखमी आणि संकटात सापडलेल्या प्राण्यांना मदत करण्याचे काम करत आहे. याविषयी बोलताना अनंत अंबानी म्हणाले, ‘हा प्रकल्प एक मिशन आहे आणि मला लहानपणापासून प्राणी आवडतात. त्यामुळे असहाय्य अशा मुक्या प्राण्यांना मदत करणे मला माझी जबाबदारी वाटते’. (Vantara Project)