Vardha – Kalamb Railway Line : यवतमाळ मधील नागपूर रोडवरील डोरली इथं बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि प्रवासी रेल्वे सह इतर विविध योजनांचा श्रीगणेशा करण्यात आला.
वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गाचे (Vardha – Kalamb Railway Line) काम हे बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. वर्धा ते कळंब पर्यंतच्या 39 किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम अपूर्ण होतं त्यामुळे या रेल्वे मार्गावर रेल्वे कधी धावणार अशी उत्सुकता होती. मात्र अखेर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळातील कार्यक्रमात कळंब ते वर्धा या रेल्वे मार्गाचे ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर खासदार रामदास तडस यांनी कळंब रेल्वेस्थानकावर हिरवी झेंडे दाखवून कळंब ते वर्धा असा प्रवास सुरू केला हे रेल्वेगाडी देवळीच्या रेल्वे स्थानकावर पोहोचताच स्वागत करण्यात आले.
वर्धा यवतमाळ नांदेड या 270 किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी (Vardha – Kalamb Railway Line) केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये 750 कोटींची तरतूद करण्यात आली होती त्यामुळे या कामाला गती मिळाली या उद्घाटनानंतर खासदार रामदास तडस यांनी कळंब येथून पदाधिकारी आणि प्रवाशांसोबत वर्धापर्यंत प्रवास केला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोणत्या स्थानकांचा समावेश ? (Vardha – Kalamb Railway Line)
पहिल्या टप्प्यात वर्धा ते कळंब (Vardha – Kalamb Railway Line) पर्यंत काम पूर्ण झाले आहे. या मार्गात देवळी, भिडी, कळंब ही रेल्वे स्थानक बांधण्यात आली आहेत. या मार्गाचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय म्हणजे या मार्गामुळे वर्धा ते नांदेड हे आंतर केवळ साडेचार तासांमध्ये पार करता येणार आहे. सध्या वर्ध्याहून नांदेडला बसने पोहचण्यासाठी दहा तास लागतात. दरम्यान हा मार्ग पूर्ण झाल्यावर येथील व्यवसाय वृद्धीला हातभार लागणार आहे. पर्यायाने या भागातील विकास होण्यास मदत होणार आहे. शिवाय वर्ध्यापासून तर नांदेडपर्यंत वर्धा, देवळी, भिडी, कळंब, यवतमाळ, लसीना, तापोना, पुसद, अर्धापुर आणि नांदेड अशी स्थानके असणार आहे.
कापूस उत्पादकांना फायदा
या मार्गाचा मोठा फायदा हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. कारण वर्धा (Vardha – Kalamb Railway Line) यवतमाळ आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्याप्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. येथे मोठ्या बाजरपेठ आणि कापूस उद्योगही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील कामाचे ई लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. वर्ध्यात या रेल्वे मार्गाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.