हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती येत आहेत. वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Varivo Motor ने हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रथमच Varivo CRX लाँच (Warivo CRX Electric Scooter) केली आहे. कंपनीने 79,999 रुपयांत हि इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 90 KM पर्यंत अंतर पार करेल असा दावा केला जात आहे. चला तर मग याबाबत अगदी सविस्तर जाणून घेऊयात…
डिझाईन-
Varivo CRX च्या लुक आणि डिझाईनबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये मजबूत प्लास्टिक बॉडी वापरण्यात आली आहे. त्यामुळे रस्ता चांगला असो वा खडबडीत असो, स्कुटरला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये, 42 लिटरची बूट स्पेस, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि टर्न इंडिकेटर, आरामदायी आणि रुंद सीट, मजबूत शॉकर्स, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम, टेलिस्कोपिक सस्पेंशन यासह अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. सर्व वयोगटातील पुरुषांना तसेच महिलांच्या सुद्धा गरजा लक्षात घेऊन ही स्कूटर सादर करण्यात आली आहे.
90 किलोमीटरपर्यंत रेंज – Warivo CRX Electric Scooter
Varivo CRX इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.3 kwh बॅटरी आहे. हि बॅटरी फुल्ल चार्ज केल्यानंतर इको मोडमध्ये इलेक्ट्रिक स्कुटर 85-90 किलोमीटरपर्यंत रेंज देते तर पॉवर मोडमध्ये 70-75 किलोमीटरपर्यंत प्रवास तुम्ही करू शकता. यामध्ये वापरण्यात आलेली बॅटरी जलरोधक, अग्निरोधक आणि ब्लास्ट-प्रूफ आहे त्यामुळे स्कुटरला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. 150 किलोग्राम पर्यंत लोड सहन करण्याची क्षमता या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये आहे. (Warivo CRX Electric Scooter)
किंमत किती?
या इलेक्ट्रिक स्कुटरची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक लाल, पांढरा, ग्रे, निळ्या आणि काळ्या रंगात हि इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू शकतात. लवकरच Varivo CRX इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.