बारामती पक्षनिरीक्षपदी निवड झाल्यानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक घेत लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने पक्ष निरीक्षकांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांची बारामतीच्या पक्ष निरीक्षकपदी निवड केली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. साहेबांनी सांगितले ना तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ, मराठ्याची जात कधी माघ पुढं बघत नाय असं त्यांनी म्हंटल

साहेबांनी सांगितले ना तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ… कारण मराठ्याची जात कधी माघ पुढं बघत नाय… आणि हो बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती नाय बाबांनो, त्यात भोर , वेल्हा , मुळशी , पुरंदर , हवेली , दौंड , इंदापूर आणि पुणे शहर हे ही आहे बरं का ! म्हणून तर म्हणलो मी येतोय… अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02MHdXHyucWSFNDtbwz6eygeyhpfnhfHVTG7BUxmxPRc92tSSuQS6cQyfrjz57fLYAl&id=100044231363898&locale2=mr_IN&_rdr

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वसंत मोरे नाराज होते. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आपली अडचण होत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय यानंतर त्यांची मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही झाली होती. मात्र त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला होता. आता त्यांची थेट बारामती पक्ष निरीक्षकपदी निवड करत मनसेने पुन्हा एकदा त्यांच्यवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.