Vasantrao Chavan Passed Away : नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन; 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
1
Vasantrao Chavan Passed Away
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते आणि नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन (Vasantrao Chavan Passed Away) झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. वसंतराव चव्हाण मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

श्वास घेताना त्रास – Vasantrao Chavan Passed Away

वसंतराव चव्हाण याना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता, तसेच अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे आधी त्यांना नांदेडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ते या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र अचानक वसंतराव चव्हाण यांची तब्येत खालावली. आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. Vasantrao Chavan Passed Away

यंदा लोकसभेत दमदार विजय –

वसंतराव चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केलं. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे. नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. वसंतराव चव्हाण यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून दमदार विजय मिळवला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला. ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वसंतराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवत तत्कालिन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला आणि नांदेडमध्ये काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा फडकवला.