Vastraharan : अजरामर ‘वस्त्रहरण’ पुन्हा रंगभूमीवर; प्रसिद्ध चेहऱ्यांच्या संचात सादर होणार 5255 वा प्रयोग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vastraharan) मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक म्हणजे ‘वस्त्रहरण’. गेल्या ४४ वर्षांपासून हे नाटक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या नाटकाचे ५२५४ प्रयोग सादर झाले आणि गाजले. यानंतर आता ४४ वर्ष पूर्ण करून लवकरच या नाटकाचा ५२५५ वा विक्रमी प्रयोग रंगणार आहे. हे मराठी नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झाल्याने नाट्य रसिकांमध्ये उत्साहाचे आणि साहजिकच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुग्धशर्करा योग अर्थात दुधात साखर! कारण कित्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! (Vastraharan) या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून ‘वस्त्रहरण’ हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले.

(Vastraharan)दिवंगत अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांनी १६ फेब्रुवारी १९८० साली ‘वस्त्रहरण’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेल्या ‘वस्त्रहरण’ या अजरामर कलाकृतीला आज १६ फेब्रुवारी रोजी ४४ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगभूमीवर पुन्हा एकदा ‘वस्त्रहरण’ घेऊन येत आहेत. यावेळी रंगमंचावर मोजकेच ४४ प्रयोग सादर होणार असून लवकरच या नाटकाचा ५२५५ वा प्रयोग होणार आहे. या प्रयोगाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अत्यंत दिमाखात हा प्रयोग एखाद्या सोहळ्यासारखा संपन्न होणार आहे.

(Vastraharan)