37.2 कोटीच्या शेअर्ससाठी वेदांतने आणली आहे ओपन ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । खाण क्षेत्रातील दिग्गज वेदांत लिमिटेडच्या (Vedanta Ltd) प्रमोटर्सनी शनिवारी कंपनीच्या 37.2 कोटी शेअर्ससाठी 160 रुपयांच्या शेअर्सवर म्हणजेच सध्याच्या बाजार भावापेक्षा 12 टक्के सवलत जाहीर केली. या ओपन ऑफरमध्ये कंपनीचा 10% इक्विटी स्टेक येईल. शुक्रवारी कंपनीचा शेअर एनएसई वर 3.5 टक्क्यांनी घसरून 178.85 रुपयांवर बंद झाला. ऑक्टोबर 2020 मध्ये, कंपनीची डीलिस्टिंग करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.

कंपनीने स्टॉक एक्स्चेंजमध्ये म्हटले आहे की, त्यांनी स्वत: ची ही ऑफर आणली असून त्याअंतर्गत कंपनीचे 371,750,500 इक्विटी शेअर्स येतात आणि ते वेदांत लिमिटेडच्या 10 टक्के शेअर कॅपिटल आहे. तसेच पुढे असेही सांगितले गेले आहे की, ही सार्वजनिक घोषणा जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट ने केली आहे, जी ऑफरची मॅनेजर कंपनी आहे. या व्यतिरिक्त ही माहितीही यात देण्यात आली आहे की, त्यात कोणकोणत्या कंपन्या शेअर्स खरेदी करतील.

स्टॉक एक्सचेंज फायलिंगनुसार PAC 1 मध्ये स्टार होल्डिंग, PAC 2 वेदांत होल्डिंग आणि PAC 3 मध्ये वेदांत होल्डिंग मॉरिशसचा समावेश आहे.

https://t.co/a6vt1pL463?amp=1

BPCL मधील भाग खरेदीसाठी वेदांतने लावली आहे 59 हजार कोटींची बोली
विशेष म्हणजे, देशातील दुसर्‍या क्रमांकाची पेट्रोलियम कंपनी असलेली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये 52.98 टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी सरकारला तीन बिड्स मिळाल्या आहेत. यात वेदांत यांनी 59 हजार कोटींची बोली लावली आहे. BPCL च्या खासगीकरणातून 45,000 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, अशी केंद्र सरकारची आशा आहे.

https://t.co/k41ljuuAuB?amp=1

वेदांत गटाने बीपीसीएलमधील शासकीय 52.98 टक्के हिस्सा संपादन करण्यासाठी EoI दिला आहे. उद्योगपती अनिल अग्रवाल यांची कंपनी वेदांत हा बीपीसीएल खरेदी करण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.

https://t.co/MRR2BePKjx?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment