Vegetable Farming | कोणत्या महिन्यात पिकांची लागवड केल्याने मिळेल भरघोस नफा?, जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vegetable Farming  | आजकाल शेतकरी अनेक नवीन पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत. नफा मिळवण्यासाठी ते वेगवेगळ्या पिकांची लागवड करत आहेत. परंतु कधी कधी ते एखदे पीक चुकीच्या वातावरणात किंवा चुकीच्या महिन्यात लावतात. अशावेळी त्या पिकाला असणारे पोषक वातावरण त्याला मिळत नाही. आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. परंतु भाजीपाला तसेच इतर देखील पिके त्या त्या महिन्यानुसार किंवा त्या हंगामानुसार लावावे लागतात. आता आपण कोणत्या दिवसांमध्ये म्हणजेच कोणत्या महिन्यामध्ये कोणते पीक (Vegetable Farming )घेतल्याने ते चांगले हे आपण पाहूया.

जानेवारी महिना

या महिन्यांमध्ये साधारण शेतात शिमला, राजमा, मुळा, पालक, वांगी तसेच भोपळे यांसारख्या पिके चांगली येतात.

फेब्रुवारी महिना | Vegetable Farming 

फेब्रुवारी महिन्यात थोडीफार उष्णता असते. या महिन्यात साधारणपणे फ्लॉवर, वांगी, भेंडी, टरबूज, खरबूज, काकडी इत्यादी पिकांची लागवड केली तर चांगले पीक येईल.

मार्च महिना

मार्च महिन्यात शेतकरी शेतामध्ये काकडी, गवार, भेंडी, पालक यांसारख्या भाज्यांची लागवड करतात. या वेळी जर ही पिके लावली तर शेतकऱ्यांना चांगला नफा होईल.

एप्रिल महिना

या महिन्यांमध्ये साधारण शेतकरी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. यामध्ये राजगिरा आणि मुळा ही पीक मोठ्या प्रमाणात येतात.

मे महिना

मे महिन्यामध्ये कडाक्याचे ऊन असते. यावेळी शेतात लोक कोबी, वांगी, टोमॅटो, मिरची यांसारख्या पिकांची लागवड करू शकतात.

जून महिना

जून महिन्यामध्ये कारले, भेंडी, टोमॅटो मुळा यांसारख्या पिकांचे उत्पन्न चांगले मिळू शकते.

ऑगस्ट महिना

ऑगस्ट महिन्यामध्ये गाजर, बिन, टोमॅटो, काळी मोहरी, पालक, कोथिंबीर लावली तर शेतकऱ्यांना (Vegetable Farming ) चांगले उत्पादन भेटेल.

सप्टेंबर महिना

सप्टेंबर महिन्यामध्ये बटाटे, कोथिंबीर, बडीशेप ब्रोकोली यांसारख्या पिकांची लागवड करता येते. त्याचप्रमाणे काही लोक टोमॅटो, कोबी यांसारखी पिके देखील लावतात.

ऑक्टोबर महिना

ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारण थंडी असते.या महिन्यात विविध पिकांची लागवड करता येते. गाजर, टोमॅटो, कडधान्य, कांदे, वांगी, मटार, राजमा कोथिंबीर अशी वेगवेगळी पिके आपण या महिन्यांमध्ये घेऊ शकतो.

नोव्हेंबर महिन्यात

नोव्हेंबर महिन्यात शेतकरी बीट रूट, फ्लावर टोमॅटो, कांदा, वाटाणे लसूण यांसारख्या पिकांची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळू शकतात.

डिसेंबर महिना

डिसेंबर महिन्यात शेतात खास करून टोमॅटो, काळी मोहरी, पालक, मुळा वांगी कोबी, कांदे यांसारखे पीक लावतात.

तुम्ही जर त्या त्या महिन्याच्या वातावरणानुसार पिके लावली तर तुम्हाला खूप चांगलं फायदा मिळेल. काही पिकांना जास्त तापमानाची गरज असते तर काही पिके ही सौम्य तापमानात चांगली वाढतात. त्यामुळे आपण त्या पिकांचे गुणधर्म लक्षात घेऊन वातावरणाप्रमाणे जर शेतात पिके लावली तर शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा होईल.