Vegetable Price Hike | गणेशोत्सव गृहिणींसाठी महागणार; 10 ते 20 टक्क्यांनी वाढले भाज्यांचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vegetable Price Hike | महाराष्ट्रात आता लागोपाठ सण आलेले आहेत. गणेशोत्सव त्यानंतर दसरा, दिवाळी हे सण लागोपाठ येणार आहेत. सध्या गणरायाच्या आगमनाची तयारी सर्वत्र चालू झालेली आहे. सार्वजनिक ठिकाणी त्याचप्रमाणे घरगुती गणपतीची तयारी देखील चालू झालेली आहे. लोक आनंदाने आणि उत्साहाने गणपती साजरा करतात. परंतु यावर्षी गणेशोत्सव जरा महाग जाणार आहे. खास करून महिलांसाठी महाग असणार आहे. कारण भाज्यांच्या दरात (Vegetable Price Hike) आता 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. गणेशोत्सवात भाज्या आणि फळांची किंमत जास्त वाढणार आहे. त्यामुळे तुमच्या खिशाला अतिरिक्त बाहेर पडू पडणार आहे.

सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे भाज्यांची आवाक (Vegetable Price Hike) देखील कमी झालेली आहे. त्यामुळे आता लसूण, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर तसेच घेवड्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. ही वाढ 10 ते 20 टक्क्यांनी झालेली आहे. त्याचप्रमाणे इतर फळभाज्यांचे दर स्थिर राहणार आहेत.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी अनेक राज्यातून तसेच परराज्यातून 90 ट्रक फळभाज्या येत असतात. यामध्ये कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश यांच्यातून मिळून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरचीचे असतात. कर्नाटक आणि गुजरात कडून 7 ते 8 टेम्पो कोबी असतो. कर्नाटक आणि गुजरात कडून 3 ते 4 टेम्पो घेऊन असतो. आंध्र प्रदेश तमिळनाडूकडून 4 ते 5 टेम्पो शेवगा असतो. तसेच मध्य प्रदेशातून 10 ते 12 टेम्पो गाजर गुजरात मधून तीन ते चार टेम्पो भुईमुगाच्या शेंगा. तसेच मध्य प्रदेशातून जवळपास 10 ते 12 टेम्पो लसूण परराज्यातून महाराष्ट्रात आवाहक होत असतो. याची माहिती मार्केट यार्डमधील जेष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिलेली आहे.

सध्या पाऊस आणि ऊन या दोन्हींचा खेळ चालू झालेला आहे. त्यामुळे पालेभाज्या लवकर खराब होतात. म्हणून पालेभाज्यांच्या मागणीत देखील आता कमतरता झालेली आहे. यामध्ये कोथिंबीर, मेथी, शेपू, करडई, अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे कांदा पात, मुळा, राजगिरा, चाकवत, पुदिना, चवळी, पालक यांचे भाव स्थिर झालेले दिसत. यामध्ये कोथिंबीरची एक जुडी 70 जुडी आणि मेथीच्या पन्नास हजार जोडींची आवाज झालेली आहे.

घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर | Vegetable Price Hike

  • कोथिंबीर 3000 ते 4000 रुपये
  • मेथी – 1500 ते 2500 रुपये शेकडा
  • शेपू – 1000 ते 1500 रुपये शेकडा
  • कांदापात – 1500 ते 2000 रुपये
  • चाकवत – 800 ते 1000 रुपये
  • करडई – 500 ते 800 रुपये
  • पुदिना – 500 ते 1000 रुपये
  • अंबाडी – 500 ते 1000 रुपये
  • मुळे – 1000 ते 1800 रुपये
  • राजगिरा – 500 ते 800 रुपये
  • चुका – 500 ते 1000 रुपये
  • चवळई – 500 ते 800 रुपये
  • पालक – 1000 ते 1800 रुपये

फळांचे दर | Vegetable Price Hike

सध्या फळांचे बाजार स्थिर आहे. यामध्ये अननस, लिंबू, डाळिंब, संत्री, मोसंबी, कलिंगड, सीताफळ, पपईचे भाव स्थिर आहे. फळ बाजारात जास्त बदल झालेले पाहायला मिळालेले नाही. गणेश उत्सवाच्या काळात फळांना जास्त मागणी असते. त्यामुळे फळांचे भाव स्थिर आहेत.