Vegetables Rate | पितृपक्षात भाज्यांचे दर वाढले, शेतकऱ्यांना होतोय फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vegetables Rate | सध्या पितृपंधरवडा चालू झालेला आहे. आणि या पितृ पंधरवड्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात. त्यामुळे बाजारात भाज्यांची मागणी वाढलेली दिसत आहे. परंतु आता भाज्यांची वाढलेली मागणी पाहता भाज्यांच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सध्या पुण्यातील बाजारामध्ये भाज्यांचे दर दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे पुढील 15 दिवस भाज्यांचे हे वाढते तर कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे नवरात्रात भाज्यांच्या या दरात घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु सध्या भाज्यांचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र याचा चांगलाच फायदा होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. परंतु शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.

पितृपंधरावडा सुरू झाल्यापासून भाज्यांची (Vegetables Rate) मागणी वाढलेली आहे. परंतु भाज्यांची आवक देखील कमी झालेली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये वाढ झालेली दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसात भाज्यांची वाढ होणार आहे. पितृ पंधरवड्यात गवार, भेंडी, कारली, देठ, अळू, काकडी यांसारख्या भाज्यांच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे बाजारात आता सध्या किती दर आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

गवार 120 रुपये किलो
भेंडी – 80 रुपये किलो
कारले 80 रुपये किलो
काकडी 80 रुपये किलो
देठ 20 रुपये किलो
अळूची पाने 20 रुपये जोडी

पुण्यातील मार्केटमध्ये भाजीपाला विभागात लागणारे भाज्यांचे आभार पुणे जिल्हा आणि विभागातून होते
पाऊस नसल्यामुळे विक्रीसाठी बाजारामध्ये अनेक भाज्या देखील येत आहे. आणि त्यांचा दर्जा देखील चांगला पाहायला मिळत आहे. दरवर्षी भाज्यांचे भाव हे वाढतच असतात. या दिवसांमध्ये घरातील दिवंगत लोकांच्या नावाने नैवेद्य करून जेवण घातले जाते. ही परंपरा खूप वर्षापासून चालून झालेली आहे. यामध्ये जवळपास सगळ्याच भाज्या केल्या जातात त्यामुळे पितृपंधरावड्यात भाज्यांची मागणी वाढलेली असते.

बाजारामध्ये भाज्यांसोबत फळांची मागणी देखील वाढलेली आहे. पेरू, केळी आणि डाळिंबाची मागणी वाढलेली आहे. तसेच घाऊक आणि किरकोळ बाजारात प्रति किलो दर हा 100 ते 300 रुपये एवढा आहे. तसेच केळी 40 ते 50 रुपये डझन आहे. तसेच पेरू 20 ते 50 रुपये किलो या दराने विकले जात आहेत.