हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या अनेक शेतकरी शेतीला धरून जोड व्यवसाय करत आहेत. चांगला नफा मिळावा यासाठी शेतकरी गांडूळ खत प्रकल्प (Vermicompost Project) हाती घेत आहेत. आजवर अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पातून चांगले उत्पन्न मिळवले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन व नफा मिळवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शेतकरी फक्त ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीत हा प्रकल्प उभारू शकतात. यातून त्यांना दोन वर्षांत वार्षिक 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल.
गांडूळ खत कसे तयार करायचे?
गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी फक्त 20 बेडची गरज भासते. प्रत्येक बेडसाठी साधारण 1.5 ते 2 मीटर लांबीची आणि रुंदीची व्यवस्था करावी लागते. ताडपत्रीवर शेणखत पसरवून त्यामध्ये 100 किलो गांडुळे मिसळल्यावर एका महिन्यात सेंद्रिय खत तयार होते. हे खत मातीतील पोषक तत्वांचा पुरवठा करून पीक उत्पादनात सुधारणा करते.
गांडूळ खताचे फायदे
गांडूळ खताचे अनेक फायदे आहेत. गांडूळ खतामुळे मातीची जलधारण क्षमता सुधारते, मातीतील पोषणतत्त्वांची घनता वाढते. यासह जमिनीचा पोत टिकून राहतो. शिवाय, झाडांच्या वाढीसाठी आवश्यक हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे शेतकऱ्याला रासायनिक खतांच्या वापराची गरज उरत नाही. कमी खर्च, सोपी प्रक्रिया आणि अधिक नफा यामुळे गांडूळ खत प्रकल्प अनेकजण घेत आहेत.