हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही कधी विचार केला आहे का? कि भारतीय बाजारात एक अशी स्कुटर लाँच होईल जिची किंमत १४ लाख रुपये असू शकते? नाही ना.. पण हे खरं ठरलं आहे. कारण प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Vespa ने भारतीय मार्केट मध्ये ड्रॅगन एडिशन स्कूटर लॉन्च (Vespa 946 Dragon Edition) केली आहे. या स्कुटरची किमत तब्बल १४ लाख रुपये असून मारुती अल्टो, Creta या चारचाकी पेक्षाही Vespa च्या स्कुटरची किंमत जास्त आहे. या स्कूटरमध्ये नेमकं काय खास आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
Vespa 946 Dragon Edition ही हाँगकाँगच्या लुनार न्यू इयर सेलिब्रेशन डेपासून प्रेरित असलेली स्कुटर आहे. ही स्कूटर एमराल्ड ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आली असून स्कुटरच्या हेडलॅम्पच्या खाली आणि त्याच्या प्रोफाइलवर एक ड्रॅगन आहे. त्यात दिलेले नवीन पेंट आणि डेकल्समुळे ही स्कुटर खूपच आकर्षक दिसत आहे. या स्कूटरचे फक्त 1888 युनिट्स जगभरात विकले जातील असे कंपनीने म्हटले आहे, मात्र कंपनीने भारतीय बाजारात किती युनिट्स विकले जातील हे स्पष्ट केलेले नाही.
इंजिन आणि पॉवर – Vespa 946 Dragon Edition
स्कुटरच्या इंजिन बद्दल सांगायचं झाल्यास, Vespa 946 Dragon Edition मध्ये 50 cc चे इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 12.7bhp पावर आणि 12.8Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 8 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. वेस्पा ड्रॅगन एडिशन स्कूटरच्या पुढील बाजूस कॉइल स्प्रिंग सस्पेंशन आणि मागील बाजूस प्रीलोड मोनोशॉक सेटअप आहे. दोन्ही टायरमध्ये 220 mm डिस्क ब्रेक बसवण्यात आले आहेत, ज्यामध्ये ड्युअल चॅनल ABS सिस्टीम देखील उपलब्ध आहे.
किंमत ?
व्हेस्पा ड्रॅगन एडिशन स्कूटरचे 1,888 युनिट्स जागतिक स्तरावर उपलब्ध आहेत. भारतातील Motoplex डीलरशिपवर ग्राहक या स्कुटरचे बुकिंग करू शकतात. Vespa Dragon Edition ची भारतात एक्स-शोरूम किंमत 14.27 लाख रुपये आहे. तसा विचार केला तर या किमतीत तुम्ही महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करू शकता. Mahindra Scorpio ची एक्स-शोरूम किंमत 13.61 लाख रुपये आहे.