हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी सिनेसृष्टीतला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद सफई (Milind Safai) यांचे निधन झाले आहे. मिलिंद सफई गेल्या काही काळापासून कॅन्सर आजाराशी झुंज देत होते. आज अखेर त्यांची ही झुंज संपली आहे. आज सकाळी १०.४५ वाजता मिलिंद सफई यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिलिंद सफई यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रेमाची गोष्ट, लकडाऊन, पोस्टर बॉईज, मेअअप अशा चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. नुकतेच ते “आई कुठे काय करते” या मालिकेत दिसले होते. त्यांनी अरुंधतीच्या वडिलांची अत्यंत चोखपणे भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सहकलाकार आणि सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त केला जात आहे.
मिलिंद सफई यांनी आपल्या कामातून मराठी सेनेसृष्टीवर एक वेगळी छाप पाडली होती. ते सतत नवीन कलाकारांना प्रोत्साहन देताना आणि मार्गदर्शन करताना दिसायचे. काही वर्षांपूर्वीच त्यांनी भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या कल्याण केंद्रासाठी परीक्षक म्हणुन जबाबदारी पार पाडली होती. तसेच ते सतत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवताना दिसायचे.
दरम्यान, गुरुवारीच ज्येष्ठ अभिनेत्री सीम देव यांचे देखील निधन झाले आहे. त्या गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. गुरुवारी त्यांनी आपल्या राहत्या घरी वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असताना आता मिलिंद सफई यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मिलिंद सफई यांना मराठी कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत.