हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील अनेक टेलिफोन कंपनीने त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये बदल केलेले आहेत. तसेच अनेक कंपन्या या त्यांच्या यूजरसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहेत. अशातच वोडाफोन आयडिया ही देशातील एक सर्वात मोठी टेलिफोन कंपनी आहे. वोडाफोन आयडियाने देखील त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ केली होती. त्यानंतर युजर कमी झाले होते. परंतु आता वोडाफोन आयडियाने त्यांच्या युजरसाठी काही नवीन ऑफर्स लॉन्च केलेल्या आहेत. यातीलच एक ऑफर्स सगळ्यांच्या फायद्याची आहे. ती म्हणजे आता युजरला 12 तासांसाठी अनलिमिटेड डेटा फ्री मिळणार आहे. आता हा डेटा कोणत्या प्लॅनमध्ये मिळणार आहे. आणखी कोणत्या सुविधा मिळणार आहेत. हे आज आपण जाणून घेऊया.
वोडाफोन आयडियाने त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केल्याने त्यांचे अनेक युजर्स कमी झाले होते. अशातच युजरला टिकून ठेवण्यासाठी आणि नवीन युजर आकर्षित करण्यासाठी वोडाफोन आयडियाने हा एक भन्नाट रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेला आहे. वोडाफोन आयडियाच्या या प्लॅनमुळे आता जिओ, एअरटेल आणि बीएसएनएलची चिंता देखील वाढलेली आहे.
तुम्ही जर जास्त इंटरनेटचा वापर करत असाल, तर तुम्हाला वोडाफोन आयडियाच्या या रिचार्ज प्लॅनचा तर नक्कीच फायदा होणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा दिला जात होता. पण आता नवीन प्लॅनमध्ये तुम्ही मध्यरात्री 12 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मोफत डेटाचा अनुभव घेऊ शकता. म्हणजेच आता वोडाफोन आयडिया त्यांच्या जवळपास 12 तासांपर्यंत अनलिमिटेड डेटा फ्री देत आहे.
या अनलिमिटेड 12 तासांसाठी फ्री असणाऱ्या डेटाला तुमच्याकडून कोणत्याही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. तसेच यासाठी दुसरा खान प्लॅन देखील नाहीये. ही फ्री ऑफर सर्व प्लॅनमध्ये आपोआप लागू होईल. म्हणजे दररोज 2 जीबी किंवा त्यापेक्षा अधिक डेटा तुम्हाला लागत असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. या प्लॅनची किंमत 365 रुपये एवढी आहे.
वोडाफोन आयडियाकडे आणखी एक खास प्लॅन आहे. ज्यामध्ये युजर्सला वीकेंडला रोलओव्हरची सुविधा मिळते. म्हणजेच आठवडाभर वापरलेला उर्वरित डाटा देखील त्यांना आठवड्याच्या शेवटी वापरता येतो. हा प्लॅन तुम्हाला डेटा डिलाईटची सुविधा देते. यामध्ये तुम्ही अतिरिक्त पेमेंट शिवाय वोडाफोन आयडियाच्या ॲपच्या मदतीने 2 जीबी पर्यंत डेटा वापरू शकता.