VI ने आणला 128 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; 12 तास मिळणार फ्री इंटरनेटचा अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यातील वोडाफोन आयडिया ही भारतातील तिसरी मोठी टेलिकॉम कंपनी आहे. वोडाफोन आयडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन लॉन्च करत असतात. अलीकडेच वोडाफोन आयडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केलेला आहे. या आधीपासूनच अनेक प्रीपेड प्लॅन आहेत. त्यात काही त्यांनी बदल केलेले आहेत. वोडाफोन आयडियाने नवीन सुपर हिरो पॅक आणि हिरो पॅक लॉन्च केलेले आहेत. यामध्ये युजर्सला जास्त डेटा आणि जास्त दिवसाची व्हॅलिडीटी उपलब्ध होणार आहे. आता वोडाफोन आयडियाने कोणते प्लॅन आणले आहेत? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

वोडाफोन आयडिया सुपर हीरो प्लॅन्स

वोडाफोन आयडियाने सुपरहिरो प्लॅन लॉन्च केलेला आहे. यामध्ये जास्त डाटा मिळणार आहे. ज्या लोकांना जास्त डेटाची गरज असते. त्यांच्यासाठी हा आपल्या अत्यंत योग्य प्लॅन ठरणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला तर रोज 2 जीबी पेक्षा जास्त डाटा मिळणार आहे. तसेच मध्यरात्री 12 ते दुपारी 12 पर्यंत अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळणार आहे. वोडाफोन आयडिया प्लॅनची सुरुवात 365 रुपयांपासून होते. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 365 रुपये, 379 रुपये, 407 रुपये, 449 रुपये, 539 रुपये आणि 649 रुपये अशा वेगवेगळ्या रिचार्ज प्लॅनचे ऑप्शन मिळतात. खास करून तरुणांना लक्षात घेऊन हे डेटा प्लॅन तयार केलेले आहेत.

वोडाफोन आयडियाने याआधी हिरो अनलिमिटेड प्लॅन लॉन्च केला होता. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये युजर्सला रात्री अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा मिळते. हा प्लॅन तुम्हाला 349 रुपये, 579 रुपये, 666 रुपये, 799 मध्ये मिळतो. यामध्ये तुम्हाला अतिरिक्त डाटा देखील मिळत आहे. तसेच 5g डेटाची सुविधा देखील यामध्ये आहे.

वोडाफोन आयडियाचा 128 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

वोडाफोन आयडियाने 128 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन देखील लॉन्च केला आहे. हा एक परवडणारा प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 18 दिवसांची असते. यामध्ये तुम्हाला 10 लोकल नाईट मिनिट्स आणि शंभर MB डेटा मिळतो.