VI Recharge Plan | VI ने लॉन्च केला 26 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; मिळणार हे फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

VI Recharge Plan | जुलै महिन्यापासून देशातील तीन मोठ्या खाजगी लोकप्रिय कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया (VI Recharge Plan) यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केलेले आहे. या रिचार्जमध्ये जवळपास 15 पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झालेली होती. आणि अनेक ग्राहक हे बीएसएनएल या कंपनीकडे वळाले आहे. परंतु अशातच वोडाफोन आयडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन डेट सादर केलेला आहे. हा प्लॅन केवळ 26 रुपयाचा आहे. याआधी एअरटेलने देखील त्यांचे 26 रुपयाचे वाउचर प्लॅन लॉन्च केले होते. पण त्यामुळे आता वोडाफोन आयडियाने देखील केलेले आहे. वोडाफोन आयडिया ही देशातील सगळ्यात मोठी तिसरी दूरसंचार सेवा कंपनी आहे. याद्वारे ही कंपनी त्यांच्या युजर्सला 1.5 जीबी अतिरिक्त डेटा देते.

वोडाफोन आयडियाचा (VI Recharge Plan) हा रिचार्ज प्लॅन एक महिन्याचा आहे. हे दिवस संपल्यानंतर हा प्लॅन बंद होतो. हा केवळ एक डेटा वाउचर प्लॅन आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला कॉलिंग एसएमएस किंवा इतर कोणत्याही फायदे घेता येणार नाही. जर तुमचा दैनंदिन डेटा संपला असेल आणि तुम्हाला अतिरिक्त डेटाची गरज असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत खास आहे.

वोडाफोन आयडिया आणि एअरटेलने त्यांचे 26 रुपयाचा डेटा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनची सगळी वैशिष्ट्ये बऱ्यापैकी सेमच आहे. तुमचा जर दैनंदिन डेटा संपला असेल, तर तो डेटा वापरण्यासाठी तुम्ही हा प्लॅन वापरू शकता. परंतु यासाठी तुमचा बेस्ट प्लॅन सक्रिय असणे गरजेचे आहेत. ज्यामध्ये तुमची कॉलिंग आणि एसएमएसची सेवा उपलब्ध असतात.

जर तुम्ही वोडाफोन आयडियाचे युजर्स असेल आणि तुमचा दैनंदिन डेटा संपला असेल आणि तुम्हाला कामासाठी अधिक डेटाची आवश्यकता असेल, तर हा 26 रुपयाचा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही या प्लॅनचा वापर करून अतिरिक्त डेटाचा लाभ घेऊ शकता.