औरंगाबाद – फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची निवड झाली आहे.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या केंद्रीय समितीची बैठक काल दिल्लीत पार पडली. या बैठकीत कुलगुरू डॉ. येवले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया ही फार्मसी व्यवसाय शिक्षण व संशोधन यावर नियंत्रण करण्यासाठी स्वायत्त संस्था आहे. याबाबत धोरण ठरवण्याचे अधिकार समितीला असतात.
कुलगुरूंच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.