Monday, January 30, 2023

गुटखा पुड्यांमध्ये आढळले तब्बल 40 हजार अमेरिकन डॉलर; कोलकाता विमानतळावर केली कारवाई

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कोलकाता विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये सीमाशुल्क विभागाने चक्क गुटखा पुड्यांमधून परदेशी चलन (dollars) जप्त केले आहे. कोलकाता विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकला जाणाऱ्या सामानाची तपासणी केली असता, गुटखाच्या पुड्यांमध्ये तब्बल 40 हजार अमेरिकन डॉलर (dollars) म्हणजे भारतीय चलनानुसार 32 लाख 78 हजार रुपये जप्त केले.

सीमाशुल्क विभागाने या कारवाईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे गुटखाच्या छोट्या पुड्यांमध्ये अमेरिकन डॉलर्सच्या (dollars) नोटा घडीकरून टाकण्यात आल्या आहेत. या पुड्या फोडून त्यातून ही रोकड जप्त करण्यात आली. एवढी मोठी रक्कम अशाप्रकारे नेली जात असल्याचे पाहून कस्टम अधिकारीसुद्धा हैराण झाले आहेत.

- Advertisement -

मागील काही दिवसांत कोलकातामध्ये परदेशी चलनाशी संबंधित अनेक कारवाया करण्यात आल्या. मात्र असे पहिल्यांदाच घडले आहे की, गुटखाच्या पुड्यांमधून परदेशी चलन (dollars) जप्त करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारावर सीमाशुल्क विभागाने हि कारवाई केली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!