व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

60 विद्यार्थीनींचे अंघोळ करतानाचे Video व्हायरल; ‘हॉस्टेल’ मधीलच तरुणीचं कृत्य

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पंजाब मधील चंदीगड विद्यापीठात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ करुन इंटरनेटवरुन व्हायरल केला गेला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर काही मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वसतिगृहातील एक विद्यार्थिनीच इतर विद्यार्थिनी अंघोळ करताना त्याचे शुटींग करुन ती आपल्या एका मित्राला पाठवत होती आणि तो तिचा मित्र ते व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करत होता असा आरोप केला गेला आहे. सगळा गोंधळ झाल्यानंतर मोहाली पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेतलं आहे . तर ज्या तरुणाने व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केलेत, त्याच्याही शोध पोलीस करत आहेत.

या प्रकारानंतर मध्यरात्रीच विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन पुकारण्यात आले. विद्यापीठाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीविद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. ‘चंदिगड विद्यापीठात एका मुलीने अनेक विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केले आहे. हे अतिशय गंभीर आणि लज्जास्पद आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल. पीडित मुलींमध्ये हिंमत आहे. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. सर्वांनी संयम बाळगा, असे ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.