‘या’ कारणामुळे वनविभागाने साजरा केला हत्तीच्या बछड्याचा पहिला बर्थडे ; पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन | दक्षिण भारतात हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दक्षिण भारतात हत्तीची पूजा करणाऱ्यांची संख्याही खूप आहे. या भागात हत्तींवर आणि त्यांच्या बछाड्यांवर प्रेम करणारे खूप नागरिक आहेत. हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या भागात हत्तींची तस्करी ही खूप होत असते. तस्करी करून चोर हत्तींचे विविध अवयव विकत असतात. या तस्करांपासून हत्तींना वाचवणे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना जिकिरीचे जाते. यासाठी भारत सरकारचे वनखाते अनेक मोहिमा राबवत असते. या मोहिमांमधून तस्करांना तस्करी करण्यापासून रोखले जाते. गेल्या काही वर्षात वनखात्याने अनेक हत्तींचे प्राण वाचवले आहेत. ज्या तस्करांपासून हत्तींना किंवा त्यांच्या बछड्यांना वाचवले जाते त्यांची हत्ती पुनर्वसन केंद्रात पाठवणी केली जाते.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एका हत्तीच्या पिल्ल्याची सुटका वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानंतर त्याला कोत्तोरच्या हत्ती पुनर्वसन केंद्रात भरती केलं होतं. या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काल त्याचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला. श्री कुट्टी असं या पिल्ल्याच नाव आहे. त्याला केक चारून त्याचा वाढदिवस केल्याचं दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment