१९९० पासून वराळी शिवसेनेचा बालेकिल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो विधानसभा । सूत गिरण्यांमुळे पूर्वी प्रसिद्ध असलेला वरळी मतदारसंघ आता कॉर्पोरेट हब आणि मॉल्समुळे ओळखला जातो. १९९० ते २००४ या काळात शिवसेनेचे दिवंगत नेते दत्ताजी नलावडे येथील आमदार होते. त्याकाळी वरळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईचा. कदाचित याचमुळे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी या मतदार संघाची निवड केली.

२०१९ विधानसभेसाठी वरळी मतदारसंघातून शिवसेनेकडून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत तर राष्ट्रवादीकडून ऍड. सुरेश माने रिंगणात आहेत. वरळी चे खासदार शिवसेनेचे अरविंद सावंत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांचा २३ हजार मतांनी पराभव केला होता. शिंदे यांना ६०,६२५ मते मिळाली होती तर अहिर यांना ३७,६१३ मतांवर समाधान मानावे लागले होते.

Leave a Comment