विजयानंतर समाधान आवताडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज मतमोजणीचा दिवस आहे. भाजपच्या समाधान अवताडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. यावरून अनेक भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप उमेदवार समाधान अवताडे यांनीही माध्यमांशी संवाद साधून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊ त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे याबाबत.

माध्यमांशी बोलताना भाजप उमेदवार समाधान अवताडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘विजय आमचा निश्चित आहे. फक्त आता विजयाची औपचारिकता शिलाक राहिलेली आहे. त्याचीच सार्वजन वाट पाहत आहोत. विजयाचे औपचारिक घोषणेनंतर सविस्तर भूमिका मांडेल. प्रशांत पारिचारिक आणि सर्व पंढरपुराने या पोटनिवडणुकीमध्ये मला ताकद दिली होती. माझा विजय हा जनतेचा आहे. या महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. गुलाल कार्यकर्त्यांनी उधळलेला आहे. विजय आमचाच होणार आहे हे निश्चित. फक्त उतावीळपणा नको. म्हणून औपचारिक घोषणेनंतरच विस्तृत भूमिका मांडेन”, अशी प्रतिक्रिया समाधान आवताडे यांनी दिली आहे.

पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे नशीब आजमावत होते. तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची केली गेली होती.