Paytm ला मोठा धक्का!! विजय शेखर शर्मा यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या पेटीएम चांगलेच अडचणीत सापडले आहे. अशातच पेटीएम बँकेच्या अध्यक्षांनी म्हणजेच विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेने बोर्डाची पुनर्रचना करण्याची घोषणा केली आहे. येत्या 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएमची बँकिंग सेवा बंद होणार आहे. मात्र दुसरीकडे ही मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी पेटीएमचे संस्थापक करत आहेत. अशा सर्व परिस्थितीत विजय शर्मा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आणखीन एक धक्का दिला आहे.

मुख्य म्हणजे, One97 Communications Ltd ने जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की, सें”ट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, सेवानिवृत्त IAS अधिकारी देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि सेवानिवृत्त IAS रजनी सेखरी सिब्बल यांची PPBL च्या बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्वजण स्वतंत्र संचालक म्हणून मंडळात रुजू झाले आहेत.”

तसेच, “विजय शेखर शर्मा यांनी देखील या बदलाचा एक भाग म्हणून पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बोर्डाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर PPBL ने आम्हाला कळवले आहे की, लवकरच ते नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करतील” अशी माहिती परिपत्रकात दिली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यामध्येच भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, तुमच्या जर पेटीएम यूपीआय सेवा पेटीएम पेमेंटशी जोडल्या गेल्या असतील तर 15 मार्च नंतर त्या चालू राहणार नाहीत. परंतु ही सेवा सुरू ठेवायची असेल तर ग्राहक आणि व्यापाऱ्यांना त्यांचे पेटीएम यूपीआय दुसऱ्या बँकेशी लिंक करावे लागेल.