मोठी बातमी! अजित पवारांची डोकेदुखी वाढणार; विजय शिवतारे बारामतीतूनच लोकसभा लढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vinay Shivtare) यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघातून लढावी यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज शिवतारेंनी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मधूनच उभे राहावे, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ज्यामुळेच आता बारामती मतदारसंघातूनच शिवतारेच मैदानात उतरतील हे स्पष्ट झाले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला या निर्णयामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांची डोकेदुखी वाढली. कारण की, अजित पवार यांनी शरद पवार गटाविरोधात लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांना उतरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी विजय शिवतारे हे नमो विचार मंचच्या माध्यमातून अपक्ष म्हणून उभे राहणार आहेत. या संदर्भातच आज सासवडमध्ये विजय शिवतारे यांची पदाधिकाऱ्यांसह बैठक पार पडली. या बैठकीमध्येच शिवतारे यांच्या उमेदवारीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामुळेच आता शिवसेनेच्या बाजूने विजय शिव तावरे बारामतीतून उभे राहतील हे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती स्वतः विजय शिवतारे यांनी माध्यमांना दिली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे.

एकमताने ठराव मंजूर…

माध्यमांशी बोलताना शिवतारे यांनी म्हटले आहे की, “आज सव्वा तास बैठक चालली. यावेळी एकमताने ठराव पास करण्यात आला. बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही. मी देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेच्या मतदारसंघ आणि मालकी कोणाची नाही. सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे. आपला स्वाभिमान जागृत होऊन आपण लढलं पाहिजे”

त्याचबरोबर , “अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक काही नव्हतं. परंतु, अजित पवारांनी सभ्यतेची सगळी पातळी ओलांडली. तरी मी त्यांना माफ केलं आहे. त्यांचा सत्कार देखील केला आहे. मात्र आजही त्यांची गुर्मी तशीच होती” अशी टीका शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. मुख्य म्हणजे, शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे बारामतीत तिरंगी लढत पाहिला मिळणार आहे. कारण, या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाच्या बाजूने सुप्रिया सुळे, अजित पवार गटाच्या बाजूने सुनेत्रा पवार आणि शिवसेनेच्या बाजूने शिवतारे मैदानात उतरलेले पाहायला मिळतील.