व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पाटणचं वातावरण तापलं; बाजार समिती निवडणुकीत पाटणकर – देसाई आमने – सामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समितींपैकी एक असलेल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमुळे पाटणचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी आणखी 4 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 17 जागांसाठी होत आहे. या निवडणुकीत आता सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटाचे 17 व विरोधात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई गटाचे 17 असे एकूण 34 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

काल गुरूवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस पार पडला. या दिवशी माजी मंत्री पाटणकर गटाचे सुभाषराव पवार यांनी सोसायटी सर्वसाधारण, देसाई गटाच्या
मंगल पाटील यांनी महिला प्रतिनिधी, मनोज पाटील ग्रामपंचायत सर्वसाधारण, बबन भिसे अनुसूचित जाती मतदारसंघ अशा चौघांनी माघार घेतली.

पाटणकर गटाकडून सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारणसाठी : दत्तात्रय कदम, झुंजार पाटील, सुभाष पाटील, चंद्रशेखर मोरे, अभिजीत जाधव, दादासो जगदाळे, अमरसिंह पाटील, महिला प्रतिनिधीमधून : रेखा पाटील, लतिका साळुंखे, इतर मागासवर्गीय : उत्तम कदम, भटक्या विमुक्त जाती : जगन्नाथ शेळके, ग्रामपंचायत सर्वसाधारणमधून : मोहनराव पाटील, सिताराम मोरे, अनुसूचित जाती : उत्तम पवार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल : संदीप पाटील, अनुज्ञप्ती धारक व्यापारी व अडते प्रतिनिधी : अरविंद पाटील, बाळासो महाजन, हमाल व तोलारी प्रतिनिधीमधून : आनंदराव पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तांत्रिक बाबी पूर्ततेनंतर त्यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली आहे.

देसाई गटाकडून सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारणमधून : संग्राम मोकाशी, मानसिंग कदम, विलास गोडांबे, राजेंद्र पाटील, सिताराम सूर्यवंशी, बाळकृष्ण पाटील, दादासो जाधव, महिला प्रतिनिधी : वैशाली शिंदे, जयश्री पवार, इतर मागासवर्ग : नितीन यादव, भटक्या विमुक्त जाती : धनाजी गुजर, ग्रामपंचायतमधून सर्वसाधारणसाठी : जोतीराम काळे, समीर भोसले, अनुसूचित जाती :  सिद्धार्थ गायकवाड, आर्थिकदृष्ट्या दुर्बल : सुधाकर देसाई, अनुज्ञप्ती धारक व अडते प्रतिनिधी : अविनाश नाझरे, अरुण जाधव, हमाल व तोलारी प्रतिनिधीमध्ये देसाई गटाला कोणताही उमेदवार उपलब्ध झाला नाही.