7 दिवसांत स्थानिकांना नोकरीत समाविष्ट न अर्धनग्न भीक मागो आंदोलन करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
फलटण तालुक्यातील सुरवडीतील कमिन्स कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने नोकरीत समाविष्ट करून घेण्याबाबत वारंवार मागणी केली केली होती. मात्र, यावर कंपनीकडून कोणताही उचित तोडगा न काढल्याने आज सुरवडी येथील कमिन्स कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर गावातील युवक, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून ठिय्या आंदोलन केले. यावेळी कमिन्स कंपनीने 7 दिवसांत स्थानिकांना नोकरीत समाविष्ट न अर्ध नग्न भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला.

दि. 26 जानेवारी 2023 रोजी सुरवडी येथे ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेमध्ये महत्वाचा असा ठराव करण्यात आला. या ठरावानुसार कमिन्स प्रशासनाला व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर यांना ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिक युवकांना कंपनीच्या नोकरीमध्ये प्राधान्याने समाविष्ट करून घेण्याची मागणी केली. मात्र, यावर कंपनीकडून कोणताही उचित तोडगा काढण्यात आला नाही. अखेर आक्रम झालेल्या सुरवडी येथील युवक, ग्रामस्थांनी कमिन्स कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी ग्रामस्थांच्यावतीने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप आणि कमिन्स कंपनीचे गिरीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. कमिन्स कंपनीने येत्या 7 दिवसात स्थानिक युवकांना नोकरीमध्ये समाविष्ट करून न घेतल्यास फलटण येथील नाना पाटील चौक ते प्रांत कार्यालयसमोर अर्धनग्न व भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.