Satara News : पुसेसावळी दंगलीमागील खरा मास्टरमाईंड कोण? विनायक पावसकरांचा मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर रविवारी रात्री पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळावर केलेल्या हल्ल्यात 11 जण गंभीर जखमी झाले. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला. यामागे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा हात असल्याची शंका व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर आज हिंदु एकता आंदोलनाचे प्रांतिक प्रतिनिधी विनायक पावसकर यांनी कराडात पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला.

कराड येथे विनायक पावसकर यांनी आज हिंदु एकता आंदोलनाच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते. यावेळी विनायक पावसकर म्हणाले, पुसेसावळी या ठिकाणी जी दंगलीची घटना घडली. त्यामागे विक्रम पावसकर याचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. हा चुकीचा आहे. वास्तविक या घटनेमागे दुसऱ्याच लोकांचा हात आहे. ज्या मुलाने पोस्ट व्हायरल केली त्याला तो कराडमध्ये कुणाला भेटला? त्याला 24 तासानंतर का अटक करण्यात आली? तोपर्यंत तो कुणा कुणाला भेटला? याची चौकशी झाली पाहिजे.

वास्तविक, या घटनेतील आरोपींना हजर करणारे व त्यांना पाटीशी घालणारे कोण असतील तर ते  अल्ताफ शिकलगार (रा. कराड), सादिक शेख (रा. सातारा), रमजान कागदी (रा. सातारा), जमीर शेख (रा. सातारा), साभीर मुल्ला (रा. कराड), बागवाने (रा. पुसेसावळी) हे लोक आहेत. त्यामुळे यांची चौकशी करून पोलिसांनी त्यानाही अटक केली पाहिजे. पुसेसावळीतील संबंधित युवकांनी आलमगीर औरंगजेब या नावाने whatsapp ग्रुप कशासाठी काढला त्याचावर काय पोस्ट केली, काय forward केले. कश्यावर like करत होती. याची पण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पावसकर यांनी केली.

पावसकरांनी केले ‘हे’ 14 प्रश्न उपस्थित…

1) कलम १४४ असताना सुद्धा मुस्लीम मॉप का गोळा झाला प्रशासन तेव्हा काय करत होते?

2) 19 ऑगस्टला हिंदूंचा मोर्चा निघून सुद्धा 15 व्या दिवशी जामीन त्या आरोपींचा झाला. म्हणूनच परवा त्याच ग्रुपच्या मुलांनी पुन्हा धाडस केले. त्याची काय चौकशी केली?

3) बाहेरून आलेले लोक पुसेसावळीच्या धार्मिक स्थळात कसे होते?

4) घटनेमागील आरोपींना पाठीशी घालणारे कराड, पुसेसावळी, सातारा येथील असून त्यांची चौकशी कधी करणार?

5) पुसेसावळी या ठिकाणी घडलेल्या घटनेत शहीद झाले असा उल्लेख का केला गेला? याचा अर्थ काय?

6) अशा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त पोस्ट नेहमी मुस्लीम मुलेच का करतात?

7) खोटे आरोप करून वातावरण खराब करणाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करा.

8) सोशल मीडियाचा पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेमकं काय घडलं? याची चौकशी केली पाहिजे

9) पाटणला बॉम्बस्फोट ट्रेनिंग झाले त्याबद्दल अटक करून वरील ६ जणांची चौकशी कधी होणार?

10) औरंगजेबाच्या नावाने जो ग्रुप चालतो त्यामधील सर्व सदस्यांची चौकशी कधी होणार? त्यांना अटक कधी होणार?

11) या अल्ताफ शिकलगारसह, सादिक शेख, रमजान कागदी, जमीर शेख, साभीर मुल्ला यांची नावे हिंदू देव देवतांची व छत्रपती श्री. शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची सोशल मिडीयावरती विटंबना करणे, तसेच बॉम्बस्फोट घडवणे, PFI शी संबंधीत व सदस्य आहेत. तसेच या अल्पवयीन मुलाना आर्थिक पुरवठा केला जातो व औरंगजेबाचा उदो उदो करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे या ६ जणांच्या घरांची झडती घेऊन त्यांना अटक का केली नाही?

12) आमचे जे मावळे आहेत ते सर्व निर्दोष आहेत. आम्ही त्यांना सकल हिंदू समाज म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत.

13) त्यांनी जर मोर्चा काढला तर आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रती महामोर्चा काढणार आहोत.

14) सातारमधील युवकांना पाकीस्थान मधून धमकी येते याच्या मागे कोण वरील ६ जण असण्याचा संशय आहे. त्यांना अटक करून सखोल चौकशी करण्यात यावी.