Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगटविरोधात सरकारच षडयंत्र; कोणी केला गंभीर आरोप?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक मधून भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र (Vinesh Phogat Disqualified) ठरल्यानंतर भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. विनेशचे वजन ५० किलोग्रॅम पेक्षा थोडं जास्त भरल्याने ती आता फायनलमध्ये खेळू शकणार नाही, मात्रहा सर्व प्रकार म्हणजे विनेश फोगटविरुद्ध रचलेलं षडयंत्र असून यामध्ये सरकारचा हात आहे असा गंभीर आरोप तिचे सासरे राजपाल राठी यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी या संपूर्ण घटनेनंतर संताप व्यक्त केला.

राजपाल राठी म्हणाले, हे एक मोठं षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. 100 ग्रॅम वजनामुळे कोण बाहेर काढतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅमपर्यंत वजन वाढतं. तर मग त्यांना जेव्हा माहिती होतं की तिचं १०० ग्रॅम वजन जास्त आहे, तर तिचे केस कापायला हवे होते. तिच्यासोबत जे लोक होते, जो स्टाफ होता, त्यांनी अजिबात तिची मदत केली नाही. यामध्ये सरकार आणि कुस्ती फेडरेशनचा हात आहे. माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचं विनेशनं वारंवार सांगितलं होतं असेही राजपाल राठी यांनी म्हंटल. तसेच काल फाईट झाली त्यावेळी तिचं वजन जास्त का नव्हत?” असा सवालही त्यांनी केला.

नेमकं काय घडलं? Vinesh Phogat Disqualified

विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले आहे. आता ती अंतिम सामना खेळू शकणार नाही. खरं तर तिने मंगळवारच्या लढतींसाठी वजन केले परंतु नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. सर्व अडचणींना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशने वजन मंगळवारी रात्री अंदाजे 2 किलो जास्त होते. ती रात्रभर झोपली नाही आणि वजन कमी करण्यासाठी जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत तिने सर्वकाही प्रयत्न केले तरीही १०० ग्राम तिचे वजन जास्तच भरल्याने ती अंतिम सामन्यासाठी अपात्र (Vinesh Phogat Disqualified) ठरली आहे. भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. कारण संपूर्ण देशाला तिच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती.

दरम्यान, ड‍िहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे विनेश बेशुद्ध झाली असून तिला पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विनेशने तिचं वजन कमी करण्यासाठी रात्रभर बरीच मेहनत केली. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊन ती बेशुद्ध झाली. विनेश जॉगिंग, स्किपिंग सर्वकाही केलं. रात्रभर सायकल चालवली. पण केवळ 100 ग्रॅम वजनामुळे तिचं सुवर्णवेध हुकलं.