Vinesh Phogat Disqualified : भारताला धक्का!! कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र; नेमकं काय कारण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक मधून भारतासाठी अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र (Vinesh Phogat Disqualified) ठरली आहे. विनेशचे वजन ५० किलोग्रॅम पेक्षा थोडं जास्त भरल्याने ती आता फायनलमध्ये खेळू शकणार नाही. खरं तर संपूर्ण देशाला तिच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती. मात्र विनेशचे वजन काही ग्राम जास्त भरल्याने ती अपात्र घोषित झाली आहे. यामुळे तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न सुद्धा अधुरे राहिले आहे. भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.

खूप प्रयत्न करूनही अपात्र – Vinesh Phogat Disqualified

तिने मंगळवारच्या लढतींसाठी वजन केले परंतु नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. सर्व अडचणींना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशने वजन मंगळवारी रात्री अंदाजे 2 किलो जास्त होते. ती रात्रभर झोपली नाही आणि वजन कमी करण्यासाठी जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत तिने सर्वकाही प्रयत्न केले तरीही काही ग्राम तिचे वजन जास्तच भरल्याने ती अंतिम सामन्यासाठी अपात्र (Vinesh Phogat Disqualified) ठरली आहे. विनेश आता फायनल खेळू शकत नाही.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश बिगरनामांकित म्हणून दाखल झाली आणि तिला आव्हानात्मक ड्रॉ मिळाला होता. पहिल्याच सामन्यात तिच्यासमोर टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई ससाकीचे आव्हान होते. पण, २९ वर्षीय विनेश फोगटने अव्वल मानांकिस सुसाकीला चीतपट केले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी युरोपियन विजेत्या ओक्साना लिव्हा आणि उपांत्य फेरीत पॅन अमेरिकन्स स्पर्धेतील विजेती युस्नेलिस गुजमन या दोघीनाही अस्मान दाखवत विनेशने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे देशवासीयांच्या आशाही उंचावल्या होत्या. मात्र आता जास्तीच्या वजनामुळे विनेश फोगटचा अपात्र घोषित करण्यात आल्याने भारतासाठी हा मोठा धक्का आहे.