Uttarakhand violence: उत्तराखंडमधील हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू 225 जण जखमी; नेमके घडले काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरामध्ये शांत ठिकाण मानल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये (Uttarakhand violence) हिंसाचार उफाळून आला आहे. याठिकाणी तब्बल 225 जण जखमी होऊन 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सध्या या घटनेनंतर उत्तराखंडमध्ये पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात अधिक सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. यासोबत परिसरामध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये असे नेमके काय घडले ज्यामुळे हिंसाचार उफाळून आला आपण जाणून घेऊयात.

नेमके काय घडले?(Uttarakhand violence)

गुरुवारी उत्तराखंडमधील हल्दवानी येथील वनभुलपुरामध्ये बांधण्यात आलेली मशीद आणि मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका आणि पोलिसांवर तिथल्या स्थानिकांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर 225 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. यामध्ये शंभर पेक्षा अधिक पोलिसांना इजा झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बनभूलपुरा भागात मलिकच्या बागेत अनधिकृतपणे मशीद आणि मदरसा बांधण्यात आली होती. ही एकूण तीन एकर जागा होती. जे पूर्वीच्या महापालिकेने ताब्यात घेतली होती. यानंतर मशीद आणि मदरसाला सील करण्यात आले.

गुरुवारी हेच बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी गेले होते. मात्र कामाला सुरुवात होताच तेथील स्थानिकांनी जाळपोळ आणि दगडफेक (Uttarakhand violence) करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली. या सर्व घटनेत काही प्रशासन अधिकारी आणि शंभरपेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. मुख्य म्हणजे, मदरसा आणि मशीन पाडण्यावरून सुरू झालेला हिंसाचार संपूर्ण उत्तराखंडमध्ये (Uttarakhand violence) पसरला आहे. हिंसक जवानांनी गुरुवारी परिसरामध्ये जाळपोळ करण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक घरांचे गाड्यांचे आणि खाजगी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.