नागपूरात युवक काॅंग्रेसचे हिंसक आंदोलन : गाडीची जाळपोळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर | काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी ईडीने चाैकशी सुरू केली असून या विरोधात नागपूर येथे युवक काॅंग्रेसने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. नागपूर येथील जीपीअो चाैकात रस्त्यावर गाडीवर जाळपोळ करण्यात आली आहे. युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंदोलनात ही घटना घडली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराजळील चाैकात ही गाडी जाळण्यात आली. कुणाल राऊत म्हणाले, आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना त्रास देत असल्याने जाळपोळ करून निषेध करण्यात आली आहे. भाजपा ज्या पध्दतीने जाणूनबूझून त्रास देत असल्याने हा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. आमचा आक्रोश मोदी सरकारला दिसावा, यासाठी ही भूमिका घेतली आहे.

शिवानी वड्डेटीवार म्हणाल्या, मोदी सरकार ज्या पध्दतीने ईडी, पोलिस याचा गैवापर केला जात आहे. सर्वसामान्य नेत्यांना त्रास देत आहे, सोनिया गांधी यांना अटक करण्याची माहिती आम्हांला मिळाली, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. सर्वजण विचारतायत विरोधक कुठे आहेत, तेव्हा आता गाडी जाळल्याने त्यांना विरोधक कुठे आहेत हे दिसेल.