Viral Video : वर्षातून एकदा येणाऱ्या आंब्यांच्या सिझनची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. गोड रसाळ आंब्यांची बाजारात रेलचेल आहे. आता हा आंब्यांचा यावर्षीचा सिझन शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आंबे स्वस्त देखील झाले आहेत. शिवाय आंबे खरेदीची लगबगही बाजारात दिसत आहे. आंबा तयार झाल्यानंतर नैसर्गिक रित्या पूर्ण पिकण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये काही सेकंदात झाडाला लागलेली कैरी पिवळी झाल्याचे दिसत आहे. नक्की काय आहे हा व्हिडीओ ? काय आहे काही सेकंदात आंबा पिकवण्याचा फॉर्म्युला चला पाहूया…
काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)
सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झालेल्या या व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती दिसतो आहे. जो आंब्याच्या झाडाला लागलेल्या हिरव्या कैरीजवळ उभा आहे. या व्यक्तीजवळ एक रंगाचा डबा आहे. यामध्ये नारंगी रंग आहे. अगदी पिकलेल्या आंब्यासारखा … हा व्यक्ती झाडाला लागलेला आंबा या रंगाच्या डब्ब्यात बुडवतो. आणि अवघ्या सेकंदात हिरवा आंबा नारंगी होतो. एकवढेच नाही तर हा आंबा हुबेहूब पिकलेल्या आंब्यासारखा सुद्धा व्हिडीओ मध्ये दिसतो आहे. या मजेशीर व्हिडिओला युजर्सची पसंती मिळत आहे. या मजेशीर व्हिडिओला अनेकांनी लाईक देखील केले आहे.
India में टेलेंट की कोई कमी नहीं है 🤓 pic.twitter.com/VquTozUnt3
— Professor of memes (@prof_desi) May 22, 2024
प्रोफेसर ऑफ मीम्स नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २ लाख ५५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही (Viral Video) दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले…आम्ही आंबा त्याची साल काढून खाऊ. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…व्वा, काय काम आहे. तर आणखी एकाने “मला माझं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळत नाही, नाहीतर आमच्यातही टॅलेंटची कमतरता नाही”. अशी प्रतिक्रिया दिली आहे.