Viral Video : व्हायरल होतोय केळीच्या पानावर उडणारा मुलगा ; भन्नाट ट्रिकने नेटीझन्सना केलं चकित !

0
3
viral video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही प्रेरणादायी, काही माहिती सांगणारे तर बरेचसे व्हिडीओ हे मनोरंजनात्मक असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे ज्यामध्ये एका मुलगा चक्क केळीच्या पानावरुन उडताना दिसत आहे.

यापूर्वी तुम्ही अल्लाउद्दीनची हवेत उडणारी जादुई चटई पाहिली असेल. पण प्रत्यक्षात असे काही नाही हे आपल्याला माहितीच आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ (Viral Video) मध्ये मात्र एक मुलगा केळीच्या पानावरुन उडताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्राम वर व्हायरल होत असून .. प्रत्यक्षात मात्र हा मुलगा आपल्या युजर्स सोबत एक ट्रिक अजमावतोय.

व्हिडिओच्या सुरुवातीला एक मुलगा केळीच्या पानावरुन उडताना दिसतो आहे. पण जर तुम्ही हा व्हिडिओ (Viral Video) नीट पाहिला, तर तुम्हाला समजेल की त्या मुलाने केळ्याच्या पानाला आपल्या पायांखाली दाबून ठेवले आहे, आणि त्याच्या मित्रांनी त्याला काठीच्या साहाय्याने लटकवले आहे. थोडक्यात सांगायचे तर, कॅमेरा वर्क इतके उत्कृष्ट आहे की कोणीही हा बनाव ओळखू शकला नाही. यापुढे या मुलांचा डान्स या व्हिडिओत सुरु होतो. या छोट्या मुलांच्या या अप्रतिम ट्रिक मुळे सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगले व्हिह्यु मिळाले आहेत.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील hyperskidsafrica नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहीपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.एका युजरने लिहिले, “अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी हल्ली इंटरनेटवर खूप पाहायला मिळते. तर दुसऱ्याने लिहिले आहे की , “आजकाल लहान मुलं लाइक्स आणि व्यूजसाठी भन्नाट कलाकारी दाखवत आहेत.”