Viral Video : माझ्या राजा रं …! तरुणाने लॅम्बोर्गिनी वर छापली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ; व्हिडीओ एकदा पहाच

0
1
viral video maharaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : आपल्याकडे आलिशान कार असावी असे कुणाला वाटत नाही ? लॅम्बोर्गिनी ,ऑडी, मर्सिडीज , जग्वार अशा अनेक महागड्या गाड्या बाजारात आहेत. मात्र या सर्व गाड्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यातही लॅम्बोर्गिनीची गोष्ट तर काही औरच आहे. अतिशय स्टायलिश आणि हाय स्पीड आणि महागडी कार म्हणून या गाडीचा उल्लेख केला जातो. एका मराठमोळ्या तरुणाने या गाडीची खरेदी केली आहे. पण या गाडीचं सेलिब्रेशन या तरुणाने अशा पद्धतीने केले आहे की तुम्ही म्हणाल मानलं बुवा…! सध्या सोशल मीडियावर या तरुणाचा आणि त्याच्या लॅम्बोर्गिनीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. त्याचे खास कारण म्हणजे या तरुणाने आपल्या लॅम्बोर्गिनीवर छत्रपती शिवजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाचं नातं अतूट आहे. महाराजांची प्रतिमा कुणी कायमस्वरूपी टॅटूच्या रूपात गोंदवून घेतो तर कुणी आपल्या वाहनांवर. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनामनात आहेत. आपल्या लाडक्या राजाची प्रतिमा एका तरुणाने जगातल्या सर्वात महागडी कार मानली जाणाऱ्या लॅम्बोर्गिनीवर छापली आहे. “Worlds first Lamborghini with Chhatrapati Shivaji Maharaj” अशी कॅप्शन या तरुणाने सोशल मीडिया वर शेअर केलेल्या व्हिडिओला (Viral Video) लिहिली आहे.

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

या व्हिडीओ मध्ये एक तरुण रस्त्यावरून चालताना दिसत आहे . त्यानंतर भगव्या रंगाच्या कापडाने झाकलेली एक कार दिसते. व्हिडिओतील हा तरुण या गाडीवरचे कव्हर काढतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते . लॅम्बोर्गिनीच्या पुढच्या बाजूवर लावलेली दिसते. या प्रतिमेच्या खाली ‘जणता राजा’ असे लिहलेले दिसते. त्यानंतर हा तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरुन हात फिरवतो. त्यानंतर हा तरुण ही गाडी सुरु करताना दिसतो. एव्हढेच नाही तर हाय स्पीड ने ही गाडी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला झेंडा फडकावत जाते.

मराठी माणसाने एकत्र या

हा व्हिडीओ officialbeniwa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर (Viral Video) करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये इंग्रजीत लिहिले आहे की , “Worlds first Lamborghini with Chhatrapati Shivaji Maharaj” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “आता या गाडीची किंमत मूळ किमतीपेक्षा वाढली”. तर दुसऱ्या एक युजर ने लिहिले आहे की “मराठी माणसाने एकत्र या. आपल्या माणसाला मोठा करा पैशांनी म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या घरासमोर ही गाडी पाहिजे आणि त्यावर आपले महाराज.”